संजय राऊत (Political news)हे महाराष्ट्रातील असं नाव आहे जे आपले विचार बेधडकपणे मांडताना दिसतात. आज सकाळपासून जम्मू काश्मीर आणि हरियाणातील मतमोजणीला सुरूवात झाली असून हरयाणामध्ये काँग्रेसचेच सरकार येईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मीडियाशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची(Political news) पहिली यादी जाहीर होईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. तसंच आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
संजय राऊत यांनी काँग्रेस विजय निश्चित आहे असं मीडियाला सांगून जबरदस्त विश्वास व्यक्त केलाय. तर कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या, इथे जसा मराठी माणूस लढवायला आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढाई आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई हरियाणामध्ये चालू असून या लढाईत काँग्रेसच जिंकेल असा विश्वास त्यांनी दर्शविलाय.
महाराष्ट्रात राहुल गांधी, किंवा प्रियंका गांधीला मुख्यमंत्री व्हायचं नाही येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार ,उद्धव ठाकरे आम्हाला माहीत आहे जागावाटप कशा पद्धतीने व्हायला पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमचं जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. याशिवाय काँग्रेसकडे जर मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल तर त्यांनी जाहीर करावा असंही त्यांनी सांगितले.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं चेहरा असेल तर जाहीर करा आम्ही त्यांना पाठिंबा देतो, लोकांमध्ये संभ्रम नको अशी शिवसेनेची भूमिका आहे असंही मत त्यांनी यावेळी मांडलं आहे. तर खांद्यावर कोणाचं मुंडक आहे हे लोकांना दिसला पाहिजे नुसतं धड असून काय उपयोग असा टोमणाही मारला.
प्रिया दत्त निवडणूक लढणार असतील तर त्यांच्या उमेदवाराच आम्ही स्वागत करतो, आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्या यावेळी निवडणूक जिंकतील असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवलाय. याशिवाय मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इन्कमिंग होईल हे तुम्ही भविष्यात पाहाल असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. शिवसेनेत घर वापसी पुन्हा होईल का याचे उत्तर प्रत्यक्ष कृतीतून दिसेल असेही स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलेय.
हेही वाचा:
अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?
खिलाडी कुमारचा ‘सरफिरा’ सिनेमा या दिवशी OTT वर होतोय रिलीज!
दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या