सोशल मीडियावर रोज आपण लाखो व्हिडिओ पाहतो. अनेकदा सत्य घटनांचे देखील व्हिडिओ(Video) आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही सोशल मीडियावर अपघांतांचे, मारामारीचेे, चोरीचे अशा सत्य घटनांचे अनेक व्हिडिओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तुम्हाला माहित असे वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणी खूप खतरनाक असतात. अनेकदा हे प्राणी मानवी भागांमध्ये शिरल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) देखील असाच आहे. एका बिबट्याने नॅशनल पार्कमध्ये सफारीवर असणाऱ्या बसवर झडप घेतली. हे पाहून बसमधील लोकांची धांदल उडाली. या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना काल बंगळुरमधील बन्नेरघट्टामध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. बन्नेरघट्टामधील एका राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांच्या सफारीदरम्यान ही घटना घडली. या थरराक घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे की, पर्यटकांची एक बस बन्नेरघट्टाच्या राष्ट्रीय उद्यानात सफारी करत होती. दरम्यान काही काळासाठी बस एका ठिकाणी थांबली. त्याच वेळी एक बिबट्या बसच्या जवळ आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या बिबट्याने बसची खिडकी उघडून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न देखील केला.
बिबट्याने खिडकीची काच थोडी उघडी असलेली पाहून बसच्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आत शिरता आले नाही. त्याच वेळी बस ड्राव्हरने लगेच बस सुरू केली त्यामुळे बिबट्याने खाली उडी मारली. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेला दिसत आहे. आम्ही हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून karnatakaportfolio_ या अकाऊंटवरून घेतला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकजण यामध्ये चुक कोणाची असा प्रश्न विचारत आहेत.
एका युजरने म्हटले आहे की, पर्यटकांनीच बिबट्याला उकसवले असणार, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, हे प्राणी उगाचच कोणावरही हल्ला करत नाही नक्कीच कोणीतरी त्याला त्रास दिला असणार. तर एका युजरने बसमधील लोकांची अवस्था काय झाली असे असा प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा:
उत्तर भारताचा कल कही खुशी, कही गम!
शुटिंगदरम्यान मोठी दुर्घटना, गायिका जखमी; भिंती कोसळल्या अन्…; VIDEO व्हायरल
‘भूल भुलैया 3’चा डंका, कॉमेडीने भरलेल्या चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज!