शिल्पा-राज कुंद्रा यांच्यावर ईडीची टांगती तलवार, १० दिवसांत राहता बंगला खाली करण्याची नोटीस

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा बिझनेसमन पती राज कुंद्रा यांना मुंबईतील जुहू येथे असलेला त्यांचा आलिशान बंगला(Bungalow) खाली करण्याची नोटीस आली आहे. क्रिप्टो ॲसेट पॉन्झी स्कीम प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्रीचा हा बंगला तसेच पावना तलावाजवळील फार्म हाऊस तात्पुरते जप्त केले आहे. आता या जोडप्याला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना त्यांचा राहता बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिसमुळे शिल्पा आणि राज यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली असून गुरुवारी दुपारीही या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले.

शिल्पा आणि राज यांनी वकील प्रशांत पाटील यांच्याद्वारा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २७ सप्टेंबर २०२४ रोजी या जोडप्याला ईडीकडून निष्कासनाची नोटीस मिळाली असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईला जोडप्याने ‘अर्थहीन, बेफिरीर आणि मनमानी’ म्हटले आहे. आपले घर आणि कुटुंबाच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. नोटीसमध्ये ईडीने मुंबईतील घर(Bungalow) आणि पुण्यातील फार्म हाऊस १० दिवसांत रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

कथित पॉन्झी स्कीम प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर २०१८ पासून कारवाई सुरू आहे. ईडीने अमित भारद्वाज विरोधात गुन्हा दाखल केला तेव्हापासूनच राज आणि शिल्पाचीही नावे या प्रकरणाशी जोडली गेली होती. या सेलिब्रिटी दाम्पत्याने इतर सहआरोपींसह बिटकॉइनच्या रूपाने ६ कोटींहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपात म्हटले आहे.

शिल्पा आणि राज यांनी त्यांच्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, मनी लाँड्रिंगशी संबंधित पीएमएलएच्या तरतुदींनुसार या आदेशाला आव्हान दिले जाऊ शकते. मात्र आता त्या आदेशानंतर आम्हाला घर रिकामे करण्याची म्हणजेच घरातून आम्हासा बेदखल करण्याची नोटीस देण्यात येत आहे. आम्ही १५ वर्षांहून अधिक काळ या घरात राहत आहोत. या मालमत्ता ‘गुन्ह्या’च्या कमाईने नव्हे तर ‘कायदेशीर रित्या’ कमावलेल्या पैशाने खरेदी केल्या गेल्या आहेत, असेही म्हटले आहे.

हेही वाचा:

 3 अज्ञातांकडून युवकाचे अपहरण; कारमध्ये बसवलं अन्…

भारतीय क्रिकेट संघाचा चिंता ठरला हार्दिक पांड्या, व्हिडीओ पाहून तुम्ही पण व्हाल थक्क

नवरात्रोत्सवात होणार स्त्रीशक्तीचा जागर, अनुश्री फिल्म्स प्रस्तुत तीन लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला