विधानसभा निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचा स्वबळाचा नारा; काँग्रेसपासून होणार वेगळे?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीत लवकरच विधानसभा(political campaign) निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यातच आता आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत न जाता दिल्ली विधानसभा निवडणुका एकट्याने अर्थात स्वबळावर लढवणार असल्याची माहिती दिली. ‘आप’च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी हे सांगितले.

गेल्या 10 वर्षांपासून काँग्रेसला(political campaign) दिल्ली विधानसभेत एकही जागा मिळालेली नाही. तरीही आपने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तीन जागा देऊ केल्या होत्या. असे असूनही, हरयाणात आपल्या मित्रपक्षांसोबत जाणे आवश्यक वाटले नाही. कक्कर यांनी दावा केला की, काँग्रेसने ‘इंडिया’च्या घटकांनी हरयाणात युती करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि माझ्या मित्रपक्षासोबत जाणे मी आवश्यक मानले नाही.

लोकसभा निवडणुकीत ‘आप’ ने हरियाणामध्ये एक जागा लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर काँग्रेसने 10 पैकी पाच जागा जिंकल्या होत्या. कक्कर यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये आपच्या विजयाचे श्रेय पक्षाच्या विकासावर आधारित राजकारणाला दिले. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुरुवारी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत.

हरियाणात काँग्रेसने आपल्या सहयोगी भागीदारांना हलकेच घेतले आणि त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. जागावाटपावरून आप आणि काँग्रेसची निवडणूकपूर्व युती होऊ शकली नाही. हरयाणामध्ये लढलेल्या सर्व जागांवर आपला पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा:

सुपरस्टार अभिनेता प्रभासच्या लग्नाची लवकरच होणार घोषणा

नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी या गोष्टींची खरेदी करणे शुभ

शिल्पा-राज कुंद्रा यांच्यावर ईडीची टांगती तलवार, १० दिवसांत राहता बंगला खाली करण्याची नोटीस