करोडोंची कार चालवत होता गेला तोल, गाडीचा चक्काचूर अन् थरकाप उडवणारा Video

देशातच काय तर जगभरात कुठेही गाडी चालवताना फोनवर बोलू नका या सूचना वारंवार दिल्या जातात. गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन करणे फार गरजेचे असते. याकडे दुर्लक्ष केल्यास स्वतःचाच काय तर समोरील व्यक्तीचाही जीव धोक्यात पडू शकतो. मात्र वारंवार सूचना करूनही काहीलोक याकडे दुर्लक्ष करातात आणि मग शेवटी होत्याच नव्हतं होऊन बसत. सध्या याच्याशीच निगडित एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल(viral) होत आहे. व्हिडिओतील जीवघेणा थरार पाहून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल.

घडले असे की, एक प्रसिद्ध युट्युबर आपली 1.7 करोडोंची गाडी चालवत लाईव्ह स्ट्रिमिंग करत होता. मात्र चाहत्यांसोबत संपर्क साधण्याच्या नादात त्याचे आपल्या गाडीवरचा नियंत्रण सुटते आणि शेवटी नको ते होऊन बसते. लाखभराच्या फोनमुळे तरुणाचे करोडोंचे नुकसान होते. या अपघातात तरुणाच्या गाडीचा अक्षरशः चुराडा होतो. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(viral) होत आहे.

या युटूबरचे नाव आहे जॅक डोहर्टी असे आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 2 मिलियनहुन अधिक फॉलोवर्स आहेत. त्याने नुकतीच नवीन मॅक्लेरन कार खरेदी केली होती. या गाडीची किंमत करोडोंच्या घरात आहे. आपल्या मित्रांसोबत कारची मजा लुटताना त्याच्यासोबत हा अपघात घडतो. यात त्याला थोडीफार दुखापत झाली मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारची सिक्योरिटी सिस्टीम चांगली असल्याकारणाने त्याचा थोडक्यात जीव बचावतो. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

व्हिडिओच्या सुरवातीला जॅक चाहत्यांची गाडी चालवत संवाद साधताना दिसतो आणि पुढच्याच क्षणी त्याचा तोल ढासळतो आणि पुढे व्हिडिओ धूसट होऊन जातो. काही सेकंदाने व्हिडिओतील दृश्ये दिसू लागतात ज्यात त्याच्या नवीन कारचा गंभीर अपघात झाल्याचे दिसून येते. रस्त्यावर कारचे तुकडे पसरलेले असतात. त्याचा एक साथीदार यावेळी रक्तबंबाळ अवस्थेत दिसू लागतो. व्हिडिओतील थरारक संपूर्ण दृश्ये तुम्हाला आवाक् करून टाकतील. विशेष म्हणजे, एवढे झाल्यांनतरही तो व्हिडिओ बनवणे थांबवत नाही.

https://twitter.com/i/status/1842601300070224243

घटनेचा व्हिडिओ @FearBuck नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये, जॅक डोहर्टीने नुकतेच त्याचे नवीन मॅक्लारेन स्ट्रीमवर क्रॅश केले असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, ” दोरदार पावसातही तो गाडी चालवताना आपल्या फोनमध्ये बघत होता. हा निव्वळ वेडेपणा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही फोन घेऊन गाडी चालवता तेव्हा असे होते”.

हेही वाचा:

‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचा स्वबळाचा नारा; काँग्रेसपासून होणार वेगळे?

दुर्गाष्टमीला कन्यापूजन करताय? मुलींना काय गिफ्ट द्याल? एकापेक्षा एक भारी आयडिया जाणून घ्या..