उद्योगपती(a businessman) रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा ट्रस्टसह संपूर्ण समुहाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला होता. मात्र आता यासंदर्भात महत्वाची माहिती मिळाली आहे. रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची आता टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवंगत(a businessman) रतन टाटा यांच्या निधनानंतर ही जबाबदारी नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रतन टाटा यांच्याकडे 1991 मध्ये टाटा समूहाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा ते टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदावर विराजमान होते. पण आता टाटा ट्रस्टने एकमताने ही कमान नोएल टाटा यांच्याकडे सोपवली आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ असून ते गेल्या 40 वर्षांपासून टाटा समूहाशी जोडलेले आहेत.
टाटा ट्रस्टच्या कामकाजात नोएल टाटा यांनी अतिशय सक्रिय भूमिका बजावली आहे. सध्या ते टाटा ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. हा ट्रस्ट केवळ टाटा समूहाच्या परोपकारी उपक्रमांचे व्यवस्थापन करत नाही, तर टाटा समूहाची मूळ कंपनी असलेल्या टाटा सन्समध्येही टाटा ट्रस्टचा 66 टक्के हिस्सा आहे.
नोएल टाटा हे टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. ते टाटा समूहाच्या रिटेल कंपनी ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटनचे उपाध्यक्ष देखील आहेत. ट्रेंट यांच्या कार्यकाळातील यशाची सर्वत्र चर्चा आहे.
ट्रेंटचे मार्केट कॅप 2.93 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. नोएल टाटा हे ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल $500 दशलक्ष वरून $3 अब्ज झाली आहे.
हेही वाचा:
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला करणार रामराम? हरभजनने केला मोठा खुलासा
IRCTC चं नोव्हेंबर स्पेशल टुर पॅकेज, ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!
बाप आहे की सैतान! सलग 4 वर्षे पोटच्या मुलीवर करत होता अत्याचार