भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचा काल वाढदिवस(birthday) होता. सध्या भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये होणाऱ्या T२० मालिकेमध्ये कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. हार्दिक पांड्याने विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी करून दाखवली.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने मिलरचा विकेट घेऊन जगाला दाखवून दिले की तो सर्वात्तम अष्टपैलू आहे. त्याने विश्वचषकामध्ये फक्त गोलंदाजीमध्येच नाही तर फलंदाजीमध्ये सुद्धा त्याचा जोर दाखवला. त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये मोठे वळण आले आणि त्याच्या चाहत्यांचा सर्वानाच धक्का बसला.
विश्वचषकानंतर अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि त्याची माजी पत्नी नताशा यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती दिली. विभक्त झाल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. जरी हे जोडपे त्यांच्या मुलाचे सहपालक आहे. आता ११ ऑक्टोबरला हार्दिकने घटस्फोटानंतर पहिला वाढदिवस(birthday) साजरा केला. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
क्रिकेटर हार्दिक पांड्याने नताशापासून वेगळे झाल्यानंतर पहिला वाढदिवस साजरा केला. या क्रिकेटरने त्याच्या सोशल मीडियावर वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तो हसत हसत केक कापताना दिसत आहे. त्याच्या वाढदिवसाचा फोटो पोस्ट करताना, क्रिकेटरने एक मोठे कॅप्शन देखील लिहिले आहे.
फोटो पोस्ट करून हार्दिक पंड्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे एक वर्ष चढ-उतारांनी भरलेले आहे. वाढदिवस हा केवळ चिंतन करण्याची वेळ नाही तर सकारात्मकतेने पुढे जाण्याचीही वेळ आहे. मी सर्व शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी कृतज्ञ आहे आणि माझ्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यास तयार आहे. तुमच्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मी या नवीन वर्षात नवीन प्रेरणा आणि भरपूर प्रेम घेऊन पुढे जात आहे”
हेही वाचा:
मोठी बातमी! दसऱ्याच्या दिवशीच राज्यातील 50 हजार होमगार्ड्सना खुशखबर
नव्या वर्षाची सुरुवात होणार धमाकेदार, “ये रे ये रे पैसा ३” चित्रपटगृहात या दिवशी होणार दाखल!
कोल्हापुरात दिसला शाही दसऱ्याचा थाट, संभाजीराजेंची रोल्स रॉयसवर टिकल्या सर्वांच्या नजरा