संपूर्ण देशभरात दसरा(Dussehra) हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते. यादिवशी अनेकजण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. या दिवशी रावण दहनदेखील केले जाते.
सध्या दसऱ्यानिमित्त(Dussehra)रावण दहनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रावण दहनाच्या व्हिडिओत चक्क रावणच लोकांवर प्रहार करताना दिसून येत आहे. लोकं अग्निबाण सोडून रावणाला जाळण्याचा प्रयत्न करत होते मात्र सर्व उलटेच घडले. पुढे खरंतर रावनानेच लोकांवर अग्नीबाण सोडले. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
दसऱ्याच्या दिवशी रावणाचा एक भलामोठा पुतळा उभारला जातो. या पुतळ्यामध्ये गवत, कापड्याच्या चिंध्या, सुकी लाकडं, फटाके अशा विविध गोष्टी भरल्या जातात आणि संध्याकाळी याला आग लावून याचे दहन केले जाते. सत्याचा असत्यावर विजयाचे प्रतीक म्हणून रावणाचा वध केला. या व्हायरल व्हिडिओमध्येही असाच काहीसा प्रकार करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र नंतर काही भलतेच घडून बसते.
व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर दिसते की, रावण धवनाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात पेटलेला रावण आणि त्यासमोर काही अनेक लोक उभी असल्याचे दिसत आहेत. हे सर्व लोक रावन दहन पाहायला आलेली असतात मात्र रावणावर केलेला वार उलटा पडतो.
रावणाच्या टाकलेले फटाके पेट घेताच सर्वत्र उडू लागतात आणि अग्नीचे वार लोकांच्या अंगावर पडू लागतात. अंगावर येणाऱ्या या अग्नीपासून आपले बचाव करण्यासाठी सर्वजण पळू लागतात. हे सर्व दृश्य पाहून तेथील पोलीस कर्मचारीदेखील आवाक् होतात. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोक व्हिडिओतील दृश्ये पाहून थक्क झाले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @umashankarsingh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मुझफ्फरनगरमध्ये स्वतःला जाळल्यानंतर संतप्त झालेल्या रावणाने घटनास्थळी उपस्थित लोकांवर बाण सोडले असे लिहिण्यात आले आहे. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मतदेखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “रावणही म्हणतोय की आधी तुझ्या आतल्या रावणाला जाळ, मग मी जाळून घेईन” तर दुसऱ्या युजरेने लिहिले आहे, “सध्या आदिपुरुषाची सगळीकडे एवढी चर्चा सुरू आहे की रावणजीही संतापले आहेत आणि त्यांना जाळणाऱ्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे”.
हेही वाचा:
‘परदेसी गर्ल’चा नवरात्रीत ‘बहरला हा मधुमास’, डान्स पाहून चाहत्यांनी केले कौतुक
लेकीला संपवण्यासाठी आईची बॉयफ्रेण्डला सुपारी, पण तो मुलीच्याच प्रेमात पडला…
आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले