‘हा’ शेअर ठरतोय बाजारातील Multibagger स्टॉक; गुंतवणूकदारांना करतोय आकर्षित

शेअर बाजारामध्ये(stock market) धनवान होण्याच्या इच्छेने प्रत्येकजण येत असतो. काही लोकं या क्षेत्रात धनवान होतात तर काही लोकांना नुकसान होते. या सगळ्या गोष्टी कौशल्याच्या आणि भाग्याच्या आहेत. शेअर बाजारात एक मल्टी बॅगर कंपनी सध्या धुमाकूळ घालत आहे.

कंपनी बोंडाडा इंजीनियरिंगच्या शेअरने(stock market)एका वर्षात १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीला २ लाख रुपयांमध्ये बदलले आहे. या शेअरने २९.९२ रुपयांपासून ६१२.८५ रुपयांपर्यंतचा प्रवास केला आहे. तसेच जबरदस्त परतावा दिल्याने गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. हा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ६१२.८५ रुपयांच्या स्तरावर बंद झाला.

बोंडाडा इंजीनियरिंगचा IPO ऑगस्ट २०२३ मध्ये आला होता, आणि तो ११२ पटीने जास्त सबस्क्राइब झाला होता. महत्वाची बाब म्हणजे, या आयपीओमध्ये १ लॉटमध्ये १६०० शेअर्स होते. ३० ऑगस्ट २०२३ रोजी, बीएसई एसएमईवर हा शेअर ९० टक्के प्रीमियमसह १४२.५० रुपयांवर लिस्ट झाला होता.

१०,००० रुपयांची गुंतवणूक २ लाख रुपये लिस्टिंग दिवशी कंपनीच्या शेअरची क्लोजिंग किंमत २९.९२ रुपये होती. ३० ऑगस्ट २०२३ पासून ११ ऑक्टोबर २०२४ या काळात शेअरने जवळपास १९४३ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने १०,००० रुपये शेअरमध्ये गुंतवले असतील, तर त्या गुंतवणूकदाराची गुंतवणूक २ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

कंपनीची स्थापना २०१२ साली झाली होती. २ सप्टेंबर २०२४ पर्यंत कंपनीच्या प्रमोटर्सकडे ६३.३३ टक्के हिस्सेदारी होती. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ६,६०० कोटी रुपये आहे. बोंडाडा इंजीनियरिंग कंपनी अभियांत्रिकी, टेलिकॉम आणि सोलर एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांना ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन) आणि ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स सेवा पुरवते.

या कंपनीच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे, ज्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे वेधले गेले आहे. शेअर बाजारात सतत उतार-चढाव होत असले तरी बोंडाडा इंजीनियरिंगच्या शेअरने त्याच्या परफॉर्मन्सने बाजारात आपली मजबूत छाप सोडली आहे. अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे लागले आहे.

हेही वाचा:

आज ‘या’ 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ

Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं

रावणाला जाळायला निघालेले मात्र खुद्द रावनानेच लोकांवर सोडले अग्नीबाण, Viral Video