अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात… Viral Video

मागील काही काळापासून चोरीच्या (theft)घटना फार वाढत आहेत. चोरी कारण कायद्यानं गुन्हा असलं तरी लोक हा गुन्हा करताना अजिबात काचरत नाहीत. येत्या काळात चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चोर चक्क भररस्त्यात दागिन्यांची पिशवी चोरून(theft) फरार होताना दिसून आले आहेत. व्हिडिओतील थरार पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. चोराने कसे चातुर्याने हे सोने काबीज केले ते आता तुम्हीच पहा.

व्हायरल व्हिडिओतील चोरीची घटना ही अहमदाबादमधील कृष्णनगर या ठिकाणी घडली आहे. घडलं असा की, एका व्यक्ती ज्वेलर्सच्या दुकानासमोर स्कूटीवर बसला होता. त्याने स्कुटीला एक बॅग अडकवली होती. या बॅगेत 28 किलोचे चांदीचे दागिने होते ज्यांची किंमत 23 ते 25 लाख रुपये होते.

दरम्यान झाले असे की, व्यक्ती स्कुटी रस्त्याच्या कोपऱ्याला लावून त्यावर बसला होता. तेवढ्यात मागून तिथे एक चोर येतो. यावेळी त्या चोराने आपला संपूर्ण चेहरा कपड्याने झाकलेला असतो. तो गुपचूप मागून येतो आणि अजिबात वेळ न दवडता काही सेकंदातच ती बॅग घेऊन तिथून पळत सुटतो.

घडलेली घटना इतकी धक्कादायक असते की दागिन्यांच्या मालकाला काय घडले ते समजत नाही. तो निस्तब्धपणे सर्व पाहतो आणि काही क्षणानंतर चोराच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो. मात्र चोर आपल्या साथीदाराच्या बाईकवर बसून तिथून त्वरित फरार होतो आणि मग दिसेनासा होतो. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ @himansulive नावाच्या एक्स काउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अरे देवा… दरोडा इतक्या लवकर झाला… लोक बघतच राहिले! 28 किलो चांदी एकात लुटून मुखवटा घातलेल्या महिला साथीदारासह फरार! असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे.

एका युजरने लिहिले आहे, “ज्या लोकांकडे महागड्या वस्तू आहेत त्यांनी “मन की बात” ऐकू नका आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्रकरण संशयास्पद वाटते, त्या व्यक्तीने स्कूटर उशिरा चालवली, मागून स्कूटरला धडक दिली असती तर पकडले गेले असते.”

हेही वाचा:

Jio नं लाँच केले दोन नवीन प्लॅन; Swiggy आणि Amazon ची मेंबरशिप मोफत

‘मुलीकडे 20 मिनिटे बघूनही काही होत नसेल तर…’ झाकीर नाईकचे पाकिस्तानमध्ये वादग्रस्त विधान

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस