महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई; ‘या’ आमदाराला केले निलंबित; कारण…

अमरावती : अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस (political news)पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. सुलभा खोडके अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

२०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीमध्‍ये (political news)आणि त्‍यानंतरही सतत आपण पक्षविरोधी काम केल्‍याच्‍या अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे प्राप्‍त झाल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र प्रभारी रमेश चेन्‍नीथला यांच्‍या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्‍यात येत आहे, असे नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

विधान परिषदेच्‍या निवडणुकीत काँग्रेसच्‍या काही आमदारांनी ‘क्रॉस व्‍होटिंग’ केल्‍याची चर्चा होती. या आमदारांमध्‍ये सुलभा खोडके यांचेही नाव समोर आले होते, पण सुलभा खोडके यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.

दरम्‍यान, सुलभा खोडके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्‍या नेत्‍यांवर टीका केली होती. रमेश चेन्‍नीथला हे अमरावतीच्‍या भेटीवर असताना आयोजित कार्यक्रमांमध्‍ये आमदार म्‍हणून आपल्‍याला सन्‍मान देण्‍यात आला नाही. स्‍थानिक नेत्‍यांनी आपला अनेकवेळा अपमान केला, असा आरोप सुलभा खोडके यांनी केला होता.

हेही वाचा:

वाढलेल्या प्लॅनमुळे मोबाईलधारक त्रस्त; महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?

अवघ्या 20 सेकंदात 25 लाखांचे दागिने घेऊन चोर झाले फरार, पकडणार तितक्यात… Viral Video

..तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवारांची मोठी मागणी