मुलगी झाली रे! मसाबा गुप्ताच्या घरी झाले दुर्गाचे आगमन

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता हिची मुलगी आणि डिझाइनर मसाबा गुप्ता ही प्रेग्नेंट होती. मसाबा गुप्ता तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हापासून ती हा टप्पा एन्जॉय करत होती आणि वेळ मिळेल तेव्हा तिचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत होती. दसऱ्याच्या दिनी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी तिने मुलगी झाल्याची सोशल मीडियावर(social media) माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर(social media) डिझाइनर मसाबा गुप्ता आणि तिचा पती सत्यदीप मिश्रा यांनी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये लिहिले आहे की, “11.10.24”. त्याचबरोबर दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोमध्ये लिहिले आहे की, “आमची खूप खास छोटी मुलगी खूप खास दिवशी आली” त्यानंतर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी त्याच्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर केला आहे.

मसाबा गुप्तानेही तिच्या लाडक्या मुलीचा पहिला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये मसाबाचा हात दिसत आहे, जो तिच्या छोट्या राजकुमारीचे पाय धरत आहे. हे सुंदर चित्र हृदय चोरण्यासाठी पुरेसे आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “आमच्या जगात मुलीचे स्वागत आहे. त्याने एक शेर इमोजी देखील तयार केला आहे.

मसाबा गुप्ताच्या पोस्टचा कमेंट बॉक्स अभिनंदनाने भरला होता. भाग्यश्री, शाहीन भट्ट, सोनी राझदान, बिपाशा बसू, दिया मिर्झा, नवीन आई रिचा चढ्ढा, कृतिका कामरा, अनुष्का शर्मा, अथिया शेट्टी, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर, रिया कपूर आणि हुमा कुरेशी या सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले आहे.

मसाबाने अद्याप नीना गुप्ता यांच्या नातवाचा चेहरा दाखवलेला नाही . तिने फक्त बाळाच्या पायाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचबरोबर चाहते मसाबा आणि सत्यदीपचे अभिनंदनही करत आहेत. नीना गुप्ता यांच्या आनंदाला सीमा नाही. त्यांची एकुलती एक मुलगी जी आई झाली आहे.

हेही वाचा:

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कांद्याचे लिलाव सुरु, प्रतिक्विंटल कांद्याला 6161 रुपयांचा दर

राजकीय, सामाजिक, हिंदुत्व तीन विचार ,पाच दसरा मेळावे

रोहित शर्माच्या घरी कधी हलणार दुसऱ्यांदा पाळणा? जुनियर हिटमॅनचे या महिन्यात होणार आगमन