‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सूरज चव्हाणने आज उपमुख्यमंत्री अजित पवार(political isuee) यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काल (11 ऑक्टोबर) रोजी मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आज बिग बॉस फेम सूरज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तसेच आगामी विधानसभा(political isuee) निवडणुकीपूर्वी अभिनेता सयाजी शिंदे यांच्यानंतर सूरज चव्हाण देखील अजित पवार गटात प्रवेश करणार का? अशी चर्चा देखील आता जोराने सुरु झाली आहे. सूरज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटी दरम्यान अजित पवार यांनी सूरज चव्हाणला रिल कसा बनवतो असं विचारले. तसेच यावेळी अजित पवार यांनी शाल, पुप्षगुच्छ आणि शिवाजी महाराज यांनी मुर्ती देत बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाणचा सत्कार केला तसेच दोघांमध्ये यावेळी काही मिनिटे चर्चा देखील झाली.
तसेच या भेटीदरम्यान मी तुला घर बांधून देईल असं देखील अजित पवार सूरजला म्हटले आहे. बिग बॉसच्या घरात असताना देखील सूरज अनेकदा आपले स्वतःचे घर चांगले असावे असे आपले स्वप्न असल्याचे सूरज सांगत होते. तसेच माझ्या गावी अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी भेटीला येणार आहे अशी माहिती देखील सूरजने यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच या भेटीदरम्यान अजित पवार यांनी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली सूरज बिग बॉसमध्ये कसा पोहोचला याबाबात देखील अजित पवार यांनी सूरजला विचारले असल्याची माहिती सूरजने माध्यमांशी बोलताना दिली.
भेटीदरम्यान तुला बिग बॉसमध्ये कसं बोलवलं असा प्रश्न अजित पवारांनी सूरजला विचारला. यावर उत्तर देत सूरज म्हणाला की, रिल बघून मला बिग बॉसमध्ये बोलावलं. जेव्हा मला बिग बॉसचा कॉल आला तेव्हा मला खरं वाटत नव्हतं पण मग खरं वाटलं आणि मी बिग बॉसमध्ये गेलो. त्यानंतर तुला रिलचे पैसे मिळतात का? असं अजित पवारांनी सूरजला विचारले. त्यावर उत्तर देत सूरज म्हणाला की, मला रीलचे पैसे मिळत नाहीत, आता पिक्चर येतोय माझा असं माध्यमांशी बोलताना सुरज चव्हाण म्हणाला.
हेही वाचा:
राजकीय, सामाजिक, हिंदुत्व तीन विचार ,पाच दसरा मेळावे
राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती – आघाडी नाही!
रोहित शर्माच्या घरी कधी हलणार दुसऱ्यांदा पाळणा? जुनियर हिटमॅनचे या महिन्यात होणार आगमन