माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. (12 ऑक्टोबर) रोजी वांद्रे येथे बाबा सिद्दीकींवर 5 ते 6 राउंड फायर करण्यात आल्या. मात्र त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी सिद्दीकींचा मृत्यू झाला. सिद्दीकींच्या मृत्यूनंतर राजकारण देखील तापल्याचं दिसत आहे. दरम्यान, त्यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर, स्वतः बिश्नोई गँगकडून(gang) याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
सध्या बिश्नोई गँगने(gang) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. ओम् जय श्री राम, जय भारत… जीवनाचं मुल्य मला माहिती आहे. ‘मी शरीर आणि पैसा धूळ मानतो. मी पाळलेलं ते सत्कर्म होतं, ते मैत्रीचं कर्तव्य होतं,’ असं बिश्नोईच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या वेळी सिद्दीकींची हत्या का करण्यात आली हे देखील या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दाऊद आणि सलमान खानसोबत संबंध ठेवल्यानं सिद्दीकी यांची हत्या सलमान गोळीबार हत्या प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा दावा कथित पोस्टमध्ये करण्यात आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच पोस्टमध्ये केला आहे.
हेही वाचा:
राजकीय, सामाजिक, हिंदुत्व तीन विचार ,पाच दसरा मेळावे
राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, विधानसभा स्वतंत्र लढणार, कोणाशीही युती – आघाडी नाही!
रोहित शर्माच्या घरी कधी हलणार दुसऱ्यांदा पाळणा? जुनियर हिटमॅनचे या महिन्यात होणार आगमन