आम्हाला राजकरण करायचं नाही, पण महाराष्ट्र अत्यंत गंभीर वळणावर आहे. महाराष्ट्र(political marketing) असुरक्षित होत असून, महाराष्ट्राचा बिहार होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. कायदा सुव्यस्था नसल्यामुळं गुंतवणीकीवर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. कोणीही येतं आणि गोळ्या घालतं. घटना झाल्यावर आरोपी पकडणं म्हणजे न्याय मिळाला असं नाही. हे सगळ्याचं फेल्युअर असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(political marketing) गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटेनवर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. Y+ सुरक्षा असूनही, पोलिस शो साठी आहेत का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात कमकुवत यंत्रणा झाल्याचे पाटील म्हणाले. नागपुरात पोलिस स्टेशनमध्ये पोलीस पत्ते खेळतात. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. महिलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं
दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवार यांना कधी फोडाफोडीची गरज कधी भासली नाही. राज ठाकरेंचा नेमका विरोधक कोण हे त्यांनी ठरवावं. त्यांची गन सगळीकडे फिरत असते, असेही जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार बोलताना सांगतात की, आमचा पक्ष फोडला. मात्र माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही आयुष्यभर काय केलं? 1978 साली काँग्रेस फोडली. 1991 साली शिवसेना फोडली, नंतर नारायण राणेंचे प्रकरण झालं. त्यामुळे तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करत आहात. असा सवाल करत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावतीने आज (13 सप्टेंबर) राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेत आहेत. या मेळ्यावातून राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
हेही वाचा:
दोन महिन्यात लाडकी बहीण योजना बंद होईल; राज ठाकरेंकडून महायुतीचे वाभाडे
“राज्यातील जनता घरात बसलेल्यांच्या…”; मुख्यमंत्री शिंदेंचे सूचक वक्तव्य
मागून आलेल्या कारची धडक; अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याला रुग्णालयात केलं दाखल
‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ