सणासुदीत सर्वसामान्यांना महागाई झटका; सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 1.84 टक्क्यांवर!

सणासुदीचा काळ सुरु असून, अशातच देशभरातील घाऊक महागाईत(inflation articles) मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील घाऊक महागाई दर 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच महिन्याच्या आदल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये तो १.१३ टक्के होता. तर सप्टेंबर 2023 मध्ये घाऊक महागाई दर 0.26 टक्के होता. हा चलन वाढीचा दर प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या महागाई दरात वाढ झाल्यामुळे वाढला आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यामध्ये घाऊक महागाई दर 1.90 टक्के इतका राहण्याची अपेक्षा होती.

खाद्यपदार्थांच्या महागाईचा(inflation articles) दर मोठ्या प्रमाणात वाढला असून, तो 9 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये घाऊक खाद्यान्न महागाई दर 9.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ आणि घाऊक महागाई या दोन्हींमध्ये अधिक वजनाच्या खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये सप्टेंबर महिन्यात लक्षणीय वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. घाऊक खाद्यान्न महागाई दर ऑगस्टमध्ये 3.26 टक्के होता, जो सप्टेंबरमध्ये 9.47 टक्के नोंदवला गेला आहे.

इंधन आणि उर्जेविषयक वस्तूंच्या किमती सप्टेंबरमध्ये घसरल्या. अर्थात मागील महिन्यातील 0.67 टक्क्यांच्या तुलनेत, त्या -4.05 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहे. घसरणीचा हा आकडा खूप मोठा आहे. त्यामागील कारण म्हणजे चांगल्या मॉन्सूनमुळे देशातील बहुतांश भागात पाऊस झाला आणि वातावरण आल्हाददायक असल्याने वीज आणि इंधन या दोन्हींची मागणी कमी राहिली आहे. या घटलेल्या मागणीचा परिणाम घाऊक इंधन आणि वीज विभागाच्या दरांवर दिसून आला असून, ते काहीसे कमी राहिले आहेत.

खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ, उत्पादन, मोटार वाहनांचे बांधकाम, ट्रेलर आणि हाफ ट्रेलर, यंत्रसामग्री आणि उपकरणे निर्मिती इत्यादींमध्ये किमतीत वाढ दिसून आली आहे. घाऊक महागाई निर्देशांक क्रमांक आणि सर्व वस्तू आणि डब्लूपीआय घटकांवर आधारित घाऊक महागाई दरामध्ये वाढ दिसून आली आहे.

हेही वाचा:

मिरचीचा खर्डा न केल्याने पत्नीवर चाकूने वार

मोठी बातमी! मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची करण जोहरशी हातमिळवणी

इचलकरंजीतील वयोश्री योजनेचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा: दिवाळीपूर्वी आनंदोत्सव