‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

मुंबई: बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेवर सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Political news todays) यांनी कडक प्रतिक्रिया दिली आहे. “बाबा सिद्धीकी यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू. दोषींना सोडणार नाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा शिंदे यांनी दिला.

मुंबईत इतर राज्यांतील गुन्हेगारी टोळ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीवर(Political news todays) टीका करताना शिंदे म्हणाले, “त्यांच्या काळात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती इतकी बिघडली होती की गृहमंत्रीच तुरुंगात गेले होते. उद्योगपतींच्या घरांसमोर बॉम्ब लावण्याचे प्रकार घडत होते आणि पोलीस यामध्ये सामील होते.”

मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. “आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्याबद्दल हे लोक प्रश्न विचारतात. डबल ढोलकीवाले कायद्याची भाषा बोलत आहेत, पण त्यांच्यात नैतिकता नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

शिंदे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना कठोर कारवाईचा निर्धार व्यक्त केला आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा:

एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला

उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

प्रवाशांना मोठा दिलासा! एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द…