नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक मोठी संधी(chance) चालून आली आहे. देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नुकतीच भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जराही वेळ वाया न घालवता तरुणांनी लगेच अर्ज करण्यास सुरुवात करावी. याचे अर्ज भरणे देखील सुरू झाले आहे. आता ही भरती नेमकी कुठे होणार, किती जागांसाठी होणार ते पाहुयात.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी थेट isro मध्ये नोकरी करण्याची संधी(chance) आहे. तब्बल 224 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. विविध पदे याद्वारे भरली जाणार आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन च्या Human Space Flight Center कडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
23 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार hsfc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या वेबसाइटवर भरतीबाबत सविस्तर माहिती मिळून जाईल.
या भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची देखील अट लागू करण्यात आली आहे. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग, बॅचलर, आयटीआय, B.Sc, उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावीमध्ये 60 टक्केपेक्षा अधिक गुण असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. 60 पेक्षा कमी गुण दहावीमध्ये नसावेत ही मुख्य अट ठेवण्यात आलीये.
वयाची अट ही पदानुसार ठेवण्यात आली आहे. पदानुसार उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28, 30 किंवा 35 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
हेही वाचा:
एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला
प्रवाशांना मोठा दिलासा! एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द…
‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान