सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ(Video) आपल्याला पाहायला मिळतात. आत्तापर्यत तुम्ही डान्स, स्टंट, जुगाड, भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील अनेकदा हे व्हिडिओ पाहिल्यावर हसू आवरत नाही. तसेच अनेकदा सीसीटीव्हीत कैद झालेल्या सत्य घटनांचे देखील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक चोरीच्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी चोरालाच ट्रोल केले आहे.

तुम्ही पाहिलेच असेच की चोर चोरी करण्याची उत्तम संधी सतत शोधत असतात. मात्र अनेकदा असे होते की, संधी मिळते पण त्यांना मार पण बसतो अशा वेळी ते तिथून काढता पाय घेतात आणि पलून जातात. सध्या अशाच प्रकारच्या चोरीचा व्हिडिओ(Video) समोर आला आहे. दाम्पत्याला लुटण्यासाठी आलेल्या चोरट्याचा प्लॅन फसला आणि त्यानंतर जोडप्याने चोराला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे रस्त्याच्या कडेला चालत आहे. दरम्यान, दुचाकीवरून आलेला एक व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचतो. दुचाकीस्वारानेही डोक्यावर हेल्मेट घातले होते. अनोळखी व्यक्ती जवळ येत असल्याचे पाहून जोडपे थांबले. दरम्यान, दुचाकीस्वाराने शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा स्थितीत ते लोक चोरट्याचा हेतू कळताच चोरट्यावर हल्ला करतात. पती-पत्नी दोघांनी मिळून चोरट्याला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @cctvidiots या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर या घटनेवर लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी चोराची मजा लुटत ‘क्या चोर बनेगा रे तू’ अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर एका युजरने म्हटले आहे की, ही चोरी आयुष्यभर त्या चोराच्या लक्षात राहील. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘बिचारा चोर चुकीच्या ठिकाणी फसला.’ तर आणखी एका युजरने म्हटले आहे क्या गुंडा बनेगा रे तू. अशा प्रतिक्रीया लोकांनी दिल्या आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
हेही वाचा:
एका दिवसात 5 कप चहा पिण्याने काय होते?
खळबळजनक! नवनीत राणांना पुन्हा धमकीचे पत्र, तीन दिवसांत दुसर्यांदा धमकी
शिंदे सेनेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर, ‘या’ आमदाराला दिली संधी