पुणे: शहरात एका अत्यंत संतापजनक घटनेत मामाकडून 4 वर्षांच्या निष्पाप भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत (police)तक्रार दाखल करताच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार पीडित मुलगी मामाच्या घरी खेळण्यासाठी गेली असताना घडला. मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत आईला सांगितल्यानंतर संपूर्ण कुटुंब हादरले. मुलीच्या पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली असून, त्याच्यावर पोक्सो (POCSO) कायद्यानुसार आणि बलात्कारविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पुण्यात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. “अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे नागरिकांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनंतर मुलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा:
मराठा आरक्षणासाठी अखेरचा श्वास घेईपर्यंत लढू – मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा
‘क्या चोर बनेगा रे तू’, चोरी करायला गेला अन् असे काही झाले की…Video
एका दिवसात 5 कप चहा पिण्याने काय होते?