भाजपसह मनसेला मोठं खिंडार, माजी आमदारासह बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वीच(Political issue) नेत्यांचं विविध पक्षात आउटगोइंग आणि इनकमिंग सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी पक्षबदल केले आहेत. अशात भाजपला आणि मनसेला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाण्यात मोठ्या राजकीय उलथापालथ बघायला मिळत आहे.

बुलढाण्यात माजी आमदार(Political issue) व भाजपचे जेष्ठ नेते धृपतराव सावळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विठ्ठलराव लोखंडकार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काल (14 ऑक्टोबर) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

बुलढाण्याचे भाजपाचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे, मुखेड-देगलूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार अविनाश घाटे, कमाल फारुकी ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाचे प्रवक्ते बॅरिस्टर उमर फारुखी, वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. रहेमान खान, अकोलाचे माजी नगराध्यक्ष तथा अध्यक्ष परिवर्तन पॅनल जम्मूशेठ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

बुलढाण्यात भाजपचे धृपतराव सावळे हे कॉँग्रेसमध्ये जाणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. अखेर त्यांनी भाजपला धक्का देत घरवापसी केली आहे. काँग्रेसमधून 21 ऑगस्ट 2015 मध्ये ते भाजपमध्ये गेले होते. धृपतराव सावळे यांना अनेक कार्यक्रमात डावललं जात असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने बुलढाणा येथे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

धृपतराव सावळे यांचा बुलढाण्यातील जनसंपर्क दांडगा आहे. सरपंच ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास बराच मोठा आहे. धृपतराव सावळे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद देखील काही काळ भूषवले आहे. 2004 मध्ये कॉँग्रेसच्या तिकिटावर ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. अशात त्यांनी पुन्हा एकदा कॉँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

हेही वाचा:

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण…

विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा