इमर्जिंग एशिया कप 2024 ची क्रिकेट(cricket) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, त्याची कमान तिलक वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. स्पर्धेतील हायहोल्टेज सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 19 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारताला आशिया कपमध्ये विजयी सुरुवात करायची आहे.
स्पर्धा कोणतीही असो, क्रिकेट(cricket) चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. आता इमर्जिंग एशिया कप 2024 मध्ये चाहत्यांना या आठवड्यात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. खरंतर, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात सामील आहेत.
जिथे, भारताचा युवा संघ 19 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया 21 ऑक्टोबरला UAE आणि 23 ऑक्टोबरला यजमान ओमानविरुद्ध सामने खेळणार आहे.
इमर्जिंग आशिया कप 2024 चे आयोजन ओमान करणार आहे. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ओमान, यूएई, अफगाणिस्तान, हाँगकाँग, श्रीलंका या संघांचा समावेश आहे, ज्यांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. 18 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जिथे पहिला सामना बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात होणार आहे. अ गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका आहे. ब गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि यूएईमध्ये खेळले जाणार आहेत.
इमर्जिंग आशिया कप स्पर्धेची ही सहावी आवृत्ती असणार आहे. पण, आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तो फक्त 50 षटकांच्या फॉरमॅटमध्येच खेळला गेला आहे. इमर्जिंग आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. टीम इंडियाने 2013 मध्ये पहिली आवृत्ती जिंकली होती. गेल्या दोनवेळा या स्पर्धेत पाकिस्तानने विजय मिळवला आहे, गेल्या वेळी इमर्जिंग आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या युवा संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.
भारतीय संघ – तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनुज रावत, प्रभसिमरन सिंग, आयुष बडोनी, निशांत सिंधू, नेहल वढेरा, रमणदीप सिंग, आकिब खान, अंशुल कंबोज, वैभव अरोरा, हृतिक शौकीन, आर साई किशोर, राहुल चहर, रसिक सलाम.
पाकिस्तान संघ – मोहम्मद हारिस (कर्णधार), अब्दुल समद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, हैदर अली, हसिबुल्ला, मेहरान मुमताज, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इम्रान जूनियर, ओमेर बिन युसूफ, कासिम अक्रम, शाहनवाज दहनी, सुफियान मोकीम, यासिर खान आणि जमान खान.
हेही वाचा:
आमिर खान लवकरच करणार ‘गजनी २’ची घोषणा…
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
पिसाळलेल्या हत्तीचा भररस्त्यात धुमाकूळ, बसवर केला हल्ला, कारचा झाला चुराडा : Video Viral