सणासुदीच्या काळात टोयोटा कंपनीने Hayrider SUV Hi-Fi Festival Limited Edition लाँच(car) केली आहे. यावेळी कंपनीने SUV सोबत मोफत ऍक्सेसरी पॅकेज देखील सादर केले आहे. यामध्ये मिड-लेव्हल G आणि टॉप V ट्रिम देखील आहे. तर या जबरदस्त कारची किंमत किती आहे हे आपण जाणून घेऊयात…
या टोयोटा कारच्या(car) किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ही कार 11.14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिचे टॉप मॉडेल 19.99 लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये 50 हजार 817 रुपयांचे फेस्टिव्ह पॅकेज मोफत दिले जात आहे. या मर्यादित आवृत्तीत 13 ॲक्सेसरीज आहेत.
यामध्ये नवीन मड फ्लॅप्स, डोअर व्हिझर, हेडलॅम्प्स, फेंडर्स आणि बूटसह डोअर हँडल आणि क्रोम गार्निश यांचा समावेश आहे. याशिवाय थ्रीडी फ्लोअर मॅट, लेग्रूम लॅम्प आणि डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर यांसारखे फीचर्स देखील मर्यादित एडिशनमध्ये देण्यात आल्या आहेत.
या SUV मध्ये दोन इंजिनचा पर्याय आहे, ज्यामध्ये 1.5-लिटर इंजिन सौम्य हायब्रिड सिस्टमसह 103 PS पॉवर आणि 137 Nm पीक टॉर्क जनरेट करते, तर इतर 1.5-लीटर मजबूत हायब्रिड सिस्टम 116 PS पॉवर निर्माण करते . दोन्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
तसेच या कारमध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी, हेड्स अप डिस्प्ले, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ॲम्बियंट लाइटिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, पॅडल शिफ्टर्स, वायरलेस फोन चार्जर आणि पॅनोरामिक सनरूफ यासह इतर अनेक फीचर्स आहेत. तसेच बाजारात ही कार मारुती ग्रँड विटारा, ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, होंडा एलिवेट आणि स्कोडा कुशाक यांच्याशी स्पर्धा करणार आहे.
हेही वाचा:
टाटा समूह 5 लाख नोकऱ्या देणार; ‘या’ क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार सर्वाधिक नोकऱ्या!
महाराष्ट्राचे कारभारी कोण? 23 नोव्हेंबर रोजी ठरणार!
‘महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन…’ निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा