सुपरस्टार रजनीकांतच्या गाण्यावर परदेशी तरूणींचा अप्रतिम डान्स…Video

सोशल मीडियाव(social media)र रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपण पाहतो ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर, अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आपले हसू आवरता येते नाहीत. तुम्ही सोशल मीडियावर डान्सचे, स्टंटचे, भांडणाचे याशिवाय जुगाडाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढेच नाही तर आपल्याला परदेशातील लोकांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

सध्या असाच एक परदेशातील काही तरूणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) पाहायला मिळत आहे. या तरूणींनी सुपरस्टार रजनीकांतच्या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे. अनेकांनी त्यांच्या या डान्सचे कौतुक केले आहेत. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुपरस्टार रजनिकांतची क्रेझ फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आता पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघाच.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साडी नेसलेल्या काही मलेशियन मुली सुपरस्टार रजनीकांत यांच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून असे वाटते की रजनीकांतचे केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्यांचे प्रचंड चाहते आहेत. भारतीय पारंपारिक साड्या परिधान केलेल्या काही विदेशी महिला चौकात डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्या गाण्यावर परदेशी तरुणी नाचत आहेत ते गाणे रजनीकांत यांच्या चित्रपटातील आहे. या गाण्याची क्रेझ अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @Wiwin Ariantika या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत 60 लाख लोकांनी पाहिले आणि 5 लाख लोकांनी लाईक केले आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.

एका युजरने म्हटले आहे की, रॉकिंग, खरेच खूप जबरदस्त डान्स केला. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, परदेशी मुलींवरही साडी छान दिसते आणखी एका युजरने म्हटले आहे की, रजनिकांत सर आम्हाला देवासारखे आहेत, तुम्ही त्यांचे चित्रपट देखील पाहा, चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, खरच खूप भारी डान्स केला या पोरींनी. अशा प्रतिक्रीया देत लोकांनी या मुलींचे कौतुक केले आहे.

हेही वाचा:

टाटा समूह 5 लाख नोकऱ्या देणार; ‘या’ क्षेत्रामध्ये उपलब्ध होणार सर्वाधिक नोकऱ्या!

महाराष्ट्राचे कारभारी कोण? 23 नोव्हेंबर रोजी ठरणार!

‘महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन…’ निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा