निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करत राज्यात विधानसभा(political) निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्पात निवडणुका होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यादा होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. लोकसभेप्रमाणे यावेळी देखील राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने(political) काही दिवसांपूर्वी पक्ष चिन्हातील तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणावर माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे आणि मोठा दिसेल.
तर दुसरीकडे आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची दुसरी मागणी फेटाळली आहे. शरद पवार यांनी पिपाणी या चिन्हावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र ही मागणी आयोगाने फेटाळली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पिपाणी चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फटका बसणार का? याबाबत आता अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हामुळे आमचा उमेदवार जिंकता जिंकता हारला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता त्यानंतर आयोगाने या चिन्हावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र आता निवडणूक आयोगाने पक्षाची ही मागणी मान्य केली नसल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 45 हजाराने पराभव झाला होता. या निवडणुकीत पिपाणीला 37 हजार मते मिळाली होती. त्यामुळे तुतारी आणि पिपाणीमध्ये मतदारांना गोधळ होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून करण्यात आला होता. त्यामुळे पक्षाने निवडणुकीत पिपाणी चिन्ह रद्द करावे अशी मागणी केली होती.
हेही वाचा:
नरेंद्र मोदींच्या खुर्चीला बसणार धक्का…
सुपरस्टार रजनीकांतच्या गाण्यावर परदेशी तरूणींचा अप्रतिम डान्स…Video
अनफिट खेळाडूला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नाही! शमीच्या तब्येतीबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य