भाकरवाडी हा स्नॅक्सचा एक लोकप्रिय पदार्थ(food) आहे. महाराष्ट्रात आणि पुण्यात विशेष करून भाकरवाडी हा पदार्थ फार फेमस आहे. आतमध्ये चटपटीत स्टफिंग आणि बाहेरील कुरकुरीत आवरणाने युक्त हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही अनेकदा बाजारातून खरेदी करून या पदार्थाची चव चाखली असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा पदार्थ आता घरीदेखील बनवू शकता.
भाकरवाडी हा पदार्थ(food) घरी बनवणे फार सोपा आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच हा पदार्थ घरी बनवून याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही ही भाकरवाडी बनवून साठवून देखील ठेवू शकता. घरात तयार केलेली ही भाकरवाडी तुमच्या चहाची रंगत द्विगुणित करेल. जाणून घ्या भाकरवाडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
- मैदा – 3 कप
- बेसन – 1/2 कप
- तेल – 1 1/2 टीस्पून
- बेसन – 1 टीस्पून
- तीळ – 1 टीस्पून
- खसखस - 1 टीस्पून
- आले – 1 टीस्पून
- लसूण – किसलेले
- साखर – 1 1/2 टीस्पून
- लाल तिखट- 3 टीस्पून
- गरम मसाला- 1/4 टीस्पून
- चवीनुसार मीठ
- धणे- 1 टीस्पून
- सुके खोबरे- 1 टीस्पून
- तेल- 1/2 कप बारीक शेव
कृती
- कुरकुरीत भाकरवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम प्रथम मैदा, बेसन, तेल आणि मीठ एकत्र करून घ्या
- आता यात थोडे थोडे पाणी घालून याचे व्यवस्थित पीठ मळून घ्या
- पीठ मळून झाल्यावर यावर एक कापड टाकून बाजूला ठेवून द्या
- आता सारणासाठी गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तीळ, खसखस, एका जातीची बडीशेप आणि धणे घालून सर्वकाही नीट भाजून घ्या
- आता एका वेगळ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे, आले, लसूण घालून काही सेकंद परतून घ्या
- यानंतर यात सुकं खोबरं, शेव, साखर, बेसन आणि मीठ घालून भाजलेले मसाले घालून मिक्स करा
- आता तयार पिठाचे गोळे करून चपातीप्रमाणे पातळ लाटून घ्या
- यावर सारण टाकून पसरवा आणि याला कडा फोल्ड करून दाबा
- याचा एक रोल तयार करा
- तयार रोलला चाकूच्या साहाय्याने तुकडे करा
- यांनतर गॅसवर तेल गरम करत ठेवा
- तेल गरम झाले की तयार भाकरवडी तेलात टाका आणि मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्या
- आता तुमची कुरकुरीत भाकरवडी तयार होईल
- हवाबंद डब्यात भाकरवडी भरून तुम्हाला हवा तेव्हा याचा आस्वाद घ्या.
हेही वाचा:
राधिका आपटे लवकरच होणार आई, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप!
यूपीआय पेमेंट सर्व्हिस लवकरच 50 नवीन ॲप्सवर मिळणार; एनपीसीआयकडून मोठी घोषणा!
प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत अफेअरचा संशय, हृदय विदीर्ण झालेल्या तरुणाने दरीत उडी मारली