मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही?

आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पार पडेल. यापूर्वी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील 6 खेळाडूंना रिटेन करावं लागेल. मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असून त्यांनी आयपीएलमध्ये तब्बल 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत.

मागील दोन ते तीन वर्ष ही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी(Mumbai Indians) काही खास राहिली नव्हती. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात वाईट परफॉर्मन्समुळे मुंबईची टीम आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये बॉटमलाच राहिली. तेव्हा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्स त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये देखील बड्या आणि अनुभवी प्रशिक्षकांचा समावेश करत आहेत. मुंबई इंडियन्सने नुकतेच त्यांचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरला प्रशिक्षक पदावरून हटवून महेला जयवर्धनेवर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. तर बुधवारी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मुंबईने पारस म्हाम्ब्रे याला नियुक्त केलंय.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सला ६ खेळाडू रिटेन करायचे आहेत. रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पंड्याकडे आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यामुळे रोहित नाराज होता असे बोलले जात होते. रोहित शर्मा जर ऑक्शनमध्ये आला तर त्याला संघात घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझी उत्सुक आहेत.

परंतु मीडिया रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी रोहित शर्माला रिटेन करेल. Express Sports ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांना रिटेन करणार हे जवळपास निश्चित आहे.

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार ऑक्शनपूर्वी प्रत्येक संघाला 6 खेळाडूंना रिटेन करणार येईल. त्यापैकी पाच कॅप्ड खेळाडू (भारतीय/विदेशी) आणि जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडू असू शकतात. नवीन नियमांनुसार, कोणत्याही फ्रँचायझीला पहिल्या खेळाडूसाठी 18 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूसाठी 14 कोटी रुपये आणि तिसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी रुपये, चौथ्या आणि पाचव्या खेळाडूसाठी 18 कोटी तर सहाव्या खेळाडूसाठी 14 कोटी रुपये खर्च करावे लागतील.

मुंबई इंडियन्सने ऑक्शनपूर्वी 6 खेळाडूंना रिटेन केल्यास त्यांना एकूण 120 कोटी रुपयांपैकी 61 कोटी रुपयांचे नुकसान होईल.मुंबई इंडियन्स मेगा ऑक्शनमध्ये विकेटकिपर फलंदाज ईशान किशनला विकत घेण्याचा प्लॅन करत असून टीम डेव्हिडसाठी RTM कार्ड वापरणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत ‘आप’चा मोठा निर्णय

प्रेम करायला गेले अन् तोंडावर पडले, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा Video Viral

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता!