भारतात रेल्वेचं (train)जाळ मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. त्यामुळे अनेक प्रवाशी मोठ्या पल्ल्याचा प्रवास हा रेल्वेनेच करतात. अशातच आता रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
रेल्वे(train) बोर्डाने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक नवीन सुधारणा केली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रवाशाला प्रवासाच्या 120 दिवस आधी तिकीट काढण्याची सुविधा होती. रेल्वे बोर्डाने हा कालावधी अर्धा म्हणजे 60 दिवसांवर आणला आहे. रेल्वे बोर्डाचे संचालक संजय मुंचा यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
या नवीन नियमानुसार आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली आहे. तिकीट आरक्षित करण्यासाठीची मुदत 120 दिवसांवरून 60 दिवस करण्यात आली आहे. रेल्वेचा नवीन नियम येत्या 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. हा नवा नियम भारतीय नागरिकांसह परदेशी प्रवाशांनाही लागू होणार आहे.
याशिवाय प्रवासी प्रवासाच्या 365 दिवस अगोदर ते तिकीट बुक करू शकतात. तसेचजर पूर्वी बुक केलेले तिकीट रद्द केले असेल तर ते 60 दिवस अगोदर रद्द केले जाऊ शकते. त्याचबरोबर ताज एक्स्प्रेस आणि गोमती एक्स्प्रेसचे नियम सारखेच राहणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
तसेच दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे अनेक विशेष गाड्या चालवणार आहे. भारतीय रेल्वे देशभरात 28 विशेष ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा:
इचलकरंजीचा पेच सोडवण्यात बावनकुळेंना यश; अखेर आवाडे – हाळवणकर यांचे मनोमिलन
भारताला मोठा धक्का, ऋषभ पंतला दुखापतीमुळे मैदानंच सोडावं लागलं
सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?