गेल्या दोन महिन्यापासून चांदी आणि सोनं (buy gold)तेजीत आहे. ऐन सणा-सुदीच्या काळात दोन्ही धातूंनी ग्राहकांना चांगलाच झटका दिला. सराफा बाजारात सोनं लवकरच 80 हजार तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातूंनी चांगलीच आघाडी घेतली. दिवाळी या सणाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. दिवाळीत सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं.
मात्र, दिवाळीपूर्वीच सोनं(buy gold) 80,000 च्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सोनं वरचढच दिसून येत आहे. तर, चांदीचे दर सध्या स्थिर आहेत.या आठवड्यात 15 ऑक्टोबर रोजी सोनं 220 रुपयांनी स्वस्त झालं. 16 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा 490 रुपयांची वाढ झाली. तर काल 17 ऑक्टोबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. आज 18 ऑक्टोबररोजी देखील सोन्याने दमदार आघाडी घेतली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दुसरीकडे, गेल्या 20 दिवसांपासून चांदीचे दर स्थिर आहेत. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदीमध्ये 3 हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोनं 76,810, 23 कॅरेट 76,502, 22 कॅरेट सोनं 70,358 रुपयांवर घसरलं. तर, 18 कॅरेट आता 57,608 रुपये, 14 कॅरेट सोनं 44,934 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा:
आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!
भाजप-अजित पवार गटाला भगदाड; तीन बडे नेते ठाकरेंच्या गळाला
दप्तराचे ओझे शरीराच्या वजनाच्या १५% पेक्षा जास्त नको; शिक्षण विभागाचा आरोग्यपूरक सल्ला