सणांच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या(onion price) वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रथमच बफर स्टॉकमधून 1600 टन कांदा महाराष्ट्रातून रेल्वेमार्गे दिल्लीपर्यंत नेणार आहे. कांद्यासाठी रेल्वेचा वापर करण्याचा हा पहिलाच उपक्रम असणार आहे. ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘कांदा एक्स्प्रेस’ ही विशेष ट्रेन महाराष्ट्रातील लासलगाव रेल्वे स्थानकावरुन निघून 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील किशनगंज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
सरकारला आशा आहे की, या पुरवठ्यामुळं दिल्लीमध्ये किमती स्थिर राहण्यास मदत होईल. दिल्लीत बफर स्टॉकमधील कांदा सध्या 35 रुपये प्रति किलो या अनुदानित दराने विकला जात आहे. विविध शहरांमध्ये कांद्याचे(onion price) किरकोळ भाव 75 रुपये किलोवर पोहोचले आहेत. लखनौ, वाराणसी आसाम, नागालँड मणिपूरसह उत्तर-पूर्व राज्यांमध्ये अशीच व्यवस्था केली जाईल. तोटा कमी करण्यासाठी ‘सीलबंद कंटेनर’ वाहतुकीसाठी लॉजिस्टिक्स कंपनी कॉनकॉर्डशीही सरकार चर्चा करत आहे. घाऊक भाव कमी करण्यासाठी सध्याच्या बाजारभावानुसार कांद्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
रेल्वे वाहतुकीमुळं कांद्याचा खर्च कमी होणार असल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. नाशिक ते दिल्ली रेल्वेने एका ट्रेनच्या (56 ट्रकच्या समतुल्य) वाहतुकीसाठी 70.20 लाख रुपये खर्च येतो, तर रस्त्याने 84 लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रति ट्रेन 13.80 लाख रुपयांची बचत होते.
5 सप्टेंबरपासून, सरकार मोबाईल व्हॅन, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) दुकाने, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, मदर डेअरी यासह विविध माध्यमांद्वारे स्टोअरमध्ये साठवलेल्या कांद्यावर अनुदान देण्यास सुरुवात करेल. किरकोळ किमती कमी करण्यासाठी आपली कारवाई वाढवत दिवाळीपूर्वी ‘मोबाइल व्हॅन’ची संख्या 600 वरुन 1000 केली जाईल.
बफर स्टॉकमधील 4.7 लाख टन कांद्यापैकी 91,960 टन कांदा एनसीसीएफ आणि नाफेडला वाटप करण्यात आला आहे. तर 86,000 टन कांदा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि मणिपूरसह विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे आणि महाराष्ट्रातून ताज्या पिकाची अपेक्षित आवक असल्यामुळं सरकार किमती स्थिरावण्याबाबत आशावादी आहे. दुकानातून कांद्याची सरासरी खरेदी किंमत 28 रुपये प्रति किलो आहे.
हेही वाचा:
सणासुदीत ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त?
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विषयांची संख्या वाढणार
आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!