राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचाच बोलबाला आहे. महायुती सरकारच्या या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. आता या योजनेंतर्गतच लाडक्या बहीणींना दिवाळी बोनस(bonus) देखील मिळणार, अशी चर्चा आहे.
काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस(bonus) मिळणार असल्याचंही वृत्तामध्ये झळकलं आहे. मात्र, याबाबत सरकारने खरंच निर्णय घेतलाय का?, याबाबत अधिकृत घोषणा झालीये का?, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.
जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले आहेत. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, हे पैसे नेमके कधी येणार याची कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाहीये.
तर, सोशल मीडियावर महिलांना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस भेटणार, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. महिला वर्ग आता याची वाट बघत आहेत. मात्र, हे वृत्त खरं की खोटं याबाबत सध्या तरी संभ्रमच आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलंय की योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नाही.
बोनसबाबतचे वृत्त खोटं असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचं आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. इतकंच नाही तर, लाडक्या बहीणींना मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचंही बोललं गेलं. मात्र, याबाबतही कोणताच शासन निर्णय घेण्यात आलेला नाही.
याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही घोषणा होणार नाही. त्यामुळे दिवाळी बोनस मिळणार, अशा फक्त अफवा पसरवल्या जात आहेत. योजनेसंबंधी कोणतीही माहिती घेण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खात्री करून घ्या. अन्यथा लाडक्या बहीणींची फसवणूक केली जाऊ शकते.
हेही वाचा:
पिक्चर अभी बाकी हैं… बाहुबली 3 संदर्भात मोठी अपडेट
उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपला मोठा धक्का!
दारू पिऊन छेड काढणाऱ्या कंडक्टरला मुलींनी दिला चोप, चपला काढून बडवलं अन् … Video Viral