विधानसभा(assembly) निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपापला पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळत नसल्याने अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आता माजी मंत्र्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरु आहे.
विधानसभा(assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मी येत्या दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देतो असं देखील लक्ष्मण ढोबळे म्हणाले आहेत. लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपला राजीनामा दिल्यानंतर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी काल (17 ऑक्टो) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली आहे. तसेच अवघ्या काही दिवसांपूर्वी लक्ष्मण ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी देखील केली होती. कारण भाजप पक्षामध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मण ढोबळे यांच्याकडे केली होती.
मात्र आता या सर्व गोष्टींचा विचार करता लक्ष्मण ढोबळे हे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनचं मी राष्ट्रवादी सोडून भाजप पक्षामध्ये गेलो होतो. मात्र आता ते भाजपसोबत आले आणि पुन्हा त्रास देखील देऊ लागले आहेत.
परंतु आता अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून आता मी पुन्हा भाजप सोडत आहे असे म्हणत लक्ष्मण ढोबळे यांनी शरदचंद्र पक्षाची तुतारी हाती घेत असल्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा:
भारीच.. ‘या’ योजनेत सरकार शेतकऱ्यांना देतंय 15 लाख रुपये
उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपला मोठा धक्का!
लाडक्या बहीणींना खरंच दिवाळी बोनस मिळणार?, जाणून घ्या सत्य