रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्…

पुणे : बिबवेवाडी परिसरात डेअरीत लागलेल्या आगीत(fire) डेअरी मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर भागात मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रामदास साळुंके (वय ६५, रा. येरवडा) असे मृत्यू झालेल्या डेअरी मालकाचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात साळुंके यांची किसान डेअरी आहे. नेहमीप्रमाणे दूधाच्या गाड्या आल्यानंतर ते डेअरीत झोपायचे. गुरुवारी रात्री ते डेअरीत झोपले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास डेअरीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. लागलीच नागरिकांनी डेअरीचा दरवाजा तोडला. डेअरीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. त्यामुळे या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. तोपर्यंत आगीने पेट घेतला होता.

कात्रज अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग(fire) आटोक्यात आणली. परंतु, आगीत साळुंखे होरपळले गेले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.

गुरुवारी पहाटे घोरपडे पेठेतील पंचहौद टॉवरजवळ एका जुन्या वाड्याला लागण्याची घटना घडली होती. आगीत पाच खोल्या आणि दुकान जळाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नव्हते.

हेही वाचा:

सलमानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी

धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला

अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्याचं विधान