सध्या चांद्यापासून बांद्यापासून बिग बॉसमराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसर ते बिग बॉस मराठीचा विजेता हा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सोशल मीडियावर त्याची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या सूरज चव्हाण आणि प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या भेटी दरम्यानचा एक व्हिडिओ(video) व्हायरल होत आहे. दोघांनाही एकाच फ्रेममध्ये चाहते खूश झाले आहेत.
दोघांच्याही भेटीचा व्हिडिओ(video) स्वत: गौतमीने तिच्या इन्स्टा चॅनलवर शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओला तिने “बिग बॉस विनर” असं कॅप्शन दिलं आहे. दोघांचीही भेट मेकअप रुममध्ये झालेली दिसतेय. यावेळी त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या असून भेटी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत असून कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
सूरज चव्हाणच्या कामाबद्दल सांगायचं तर, बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी सूरज चव्हाणने आपल्या नावावर कमावल्यानंतर तो मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केले आहे.
सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ हा सिनेमा आज अर्थात १८ ऑक्टोबरला रिलीज झालेला आहे. त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. त्यानंतर सूरजचा केदार शिंदेंसोबतही एक सिनेमा येणार आहे. ‘झापूक झुपूक’ असं त्या सिनेमाचं नाव असून तो २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. त्या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं असून निर्मिती जिओ सिनेमा करीत आहे.
हेही वाचा:
रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्…
धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला
सलमानला पुन्हा धमकी? केली ‘इतक्या’ कोटींची मागणी