बंगळुरु : रोहित शर्मावर(Rohit Sharma) तिसऱ्या दिवशीच्या सामन्यात सर्वांसमोर माफी मागण्याची वेळ आली होती. रोहित शर्मा यावेळी भर मैदानात सर्वांसमोर माफी मागत असल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा यावेळी का माफी मागत होता, हे आता एका व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. रोहित शर्माचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
ही गोष्ट घडली जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. त्यावेळी न्यूझीलंडचा टीम साऊथी हा फलंदाजी करत होता. भारतासाठी टीम साऊथीची विकेट सर्वात महत्वाची होती. कारण तो यावेळी भारतासाठी धोकादायक ठरत होता. साऊथीने अर्धशतक झळाकावले होते. तो आता शतकाच्या दिशेने कूच करत होता. त्यामुळे साऊथीची विकेट भारतासाठी महत्वाची होती. पण साऊथी खेळत असताना रोहित शर्माकडून(Rohit Sharma) एक मोठी चूक झाली.
साथऊनी मोहम्मद सिराजच्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडू तटवला आणि तो चोरटी धाव घेण्यासाठी निघाला. यावेळी रोहित शर्मा या चेंडूवर धावून येत होता. रोहित शर्मा आता फलंदाजाला रन आऊट करणार की नाही, याची उत्सुतकता सर्वांना होती. रोहितने चपळाई दाखवली, पण त्याला काही रन आऊट करता आले नाही. त्यामुळे त्याने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकायचे ठरवले. पण रोहित शर्माकडून यावेळी एक मोठी चूक झाली.
रोहित शर्माने चेंडू अशा ठिकाणी फेकला की, यष्टीरक्षक किंवा स्लीपमधील कोणीही खेळाडू तो पकडू शकला नाही. त्यामुळे हा चेंडू कोणालहाी पकडता आला नाही. रोहितने एवढ्या जोरात हा चेंडू फेकला होता की, तो थेट जाऊन सीमारेषेला आदळला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला त्याने या चार धावा फुकट दिल्याचे पाहायला मिळाले. रोहितला यावेळी आपली चूक कळली. त्यामुळे रोहित शर्माने यावेळी माफी मागितली.
रोहित शर्मा हा कधी कधी खेळाडूंवर भडकतो, पण त्यानंतर त्यांची माफीही मागतो. पण जेव्हा त्याच्याकडून चूक होते तेव्हा मात्र तो स्वत: पण माफी मागतो. रोहितमुळे यावेळी न्यूझीलंडचा चार धावा मिळाल्या त्याचे चाहत्यांना वाईट वाटले, पण रोहितने यावेळी माफी मागितल्याचेही चाहत्यांना आवडले.
हेही वाचा:
‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’, भाजपचा शिवसेनेला इशारा, महायुतीत फूट?
सूरज चव्हाणसाठी गौतमी पाटीलचा ठसका, ‘तुझ्यासाठी आले…’, भेटीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्…