सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का?

अलिकडेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्विकारल्याचं बोललं जात आहे. तेव्हापासून या प्रकरणात सलमान खान(actor) कनेक्शनही चव्हाट्यावर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं यापूर्वीही सलमान खानच्या घरावर हल्ला करून धमक्या दिल्या आहेत. या सगळ्या दरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सलमाननं (actor)कधीही प्राण्यांची शिकार केलेली नाही. सलमानला मिळणाऱ्या धमक्या केवळ खंडणीसाठी आहेत. आम्ही कुणाचीही माफी मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी घेतली आहे. त्यांनी नुकतीच एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. तसंच, ‘सलमाननं कधीही कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही. सलमाननं कधी साधं झुरळ मारलेलं नाही. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही. असंही ते म्हणाले आहेत.

लोक आम्हाला सांगतात की, तुम्ही नेहमी खाली जमिनीकडे पाहत चालता. तुम्ही खूप सभ्य आहात. मी त्यांना सांगतो की, ही शालीनतेची बाब नाही. मला भिती वाटते की, माझ्या पायाखाली किडाही येऊन जखमी होईल. मी त्यांनाही वाचवत राहतो असंही ते म्हणाले आहेत. तसंच, बीइंग ह्युमननं किती लोकांना मदत केली आहे. कोविडनंतर ते थोड थांबल काम. अन्यथा त्यापूर्वी रोज लांबच लांब रांगा लागायच्या. काहींना ऑपरेशन करायचं असायचं, काहींना इतर मदतीची गरज होती. रोज चारशेहून अधिक लोक मदतीच्या आशेनं यायचे असंही ते म्हणाले आहेत.

काळविट प्रकरणाबाबत लॉरेन्स बिश्नोई यांनी सलमान खानकडे जोधपूरमधील बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याची मागणी केली होती. तसं न केल्यास सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई टोळीनं दिलेली आहे. या सगळ्या विषयावर बाब सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा:

‘या’ 3 राशींना करणार धनवान, डिसेंबर महिना ठरणार भाग्याचा!

भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याने सोडली पक्षाची साथ; अजित पवारांचा उल्लेख करत म्हटलं…

अजित पवारांना बालेकिल्ल्यात धक्का; विश्वासू शिलेदाराने सोडली साथ