सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओज(Video) व्हायरल होत असतात. यात अनेकदा काही धक्कादायक घटनांचाही समावेश असतो. असे व्हिडिओज अनेकदा लोकांना थक्क करून जातात. जसजसे जग पुढे जात आहे, तसतसे गुन्हेगारीचे प्रमाणही तितक्याच वेगाने वाढत आहे. लोक शुल्लक कारणासाठी एकमेकांच्या जीवावर उठतात. सध्या असाच एक भयंकर प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती रस्त्याच्या किनाऱ्याला झोपलेल्या माणसाला बेदम मारताना दिसून येत आहे.
ही सर्व घटना दिल्ली येथे घडली आहे. यात एक व्यक्ती रस्त्यावर झोपलेल्या माणसाला क्रूरपणे काठीने मारताना दिसून येत आहे. हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला तेव्हा पीडित रस्त्याच्या कडेला आरामात झोपला होता. व्यक्तीने पिडीताला पाहिले आणि अचानक काठी घेऊन मारायला सुरुवात केली. ही घटना नवी दिल्लीतील मॉडेल टाऊन भागात घडली.
मीडिया रिपोर्टनुसार, हल्लेखोराने सार्वजनिक ठिकाणी लघवी करू नको असे सांगितल्यानंतर हा बदला घेण्यासाठी केलेला हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. ही सर्व घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आणि याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
व्हिडिओच्या(Video) सुरुवातीलाच एक व्यक्ती चालत येऊन झोपलेल्या माणसाच्या जवळ जाताना दिसतो. यावेळी त्याच्या हातात एक भलीमोठी काठी असते. रस्त्यावर झोपलेल्या माणसावर हल्ला करण्याआधी तो त्याच्या डोक्यावरची चादर काढून खात्री करून घेतो. यानंतर काही क्षणातच तो झोपलेल्या माणसाला काठीने जोरदार फटके मारताना दिसतो.
अचानक आपल्यावर झालेला हल्ला पाहून तो माणूस देखील प्रचंड घाबरतो. मारून झाल्यावर हल्लखोर पुढे निघतो मात्र थोड्याच वेळात तो परत माघारी येऊन पुन्हा एकदा पीडिताला काठीने जोरजोरात मारू लागतो. यावेळी हल्लखोराचे मित्रही तिथे उपस्थित असतात. मारून झाल्यावर तो मित्रांसोबत बाईकवर बसून तिथून फरार होतो.
घटनेचा व्हायरल व्हिडिओ @najafgarhconfes नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दिल्लीचा “भितीदायक” अत्यंत भितीदायक CCTV व्हायरल व्हिडिओ!! अवघ्या काही सेकंदात 21 स्ट्रोक? दिल्लीच्या मॉडेल टाऊनमध्ये एक व्यक्ती भगवी चादर पांघरून आरामात झोपत आहे. गुंड बाईकवर येतात आणि लाठ्या मारायला लागतात!!’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आता माणसांना काही किंमत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हल्लेखोराविरोधात कडक कारवाई व्हायला हवी”.
हेही वाचा:
एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
राहुल गांधी करणार प्रणिती शिंदेंशी लग्न?; सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले…
शिंदे सेनेतील ‘या’ दोन बड्या नेत्यांविरोधात उद्धव ठाकरेंची मोठी खेळी!