महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा(current political news) कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आणि कार्यकर्त्यांची आता जोरदार तयारी सुरू आहे. सर्वच पक्ष आता प्रचाराला लागले आहेत. अशात शिंदे गटाच्या एका आमदाराचं एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे.
यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना(current political news) आणण्यासाठी गाड्या करा, फोन पे करा..असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.
संतोष बांगर यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. मतदारांना पैशाचे अमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केल्याने, संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. यावर, निवडणूक आयोग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष राहील.
आमदार बांगर यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अशात त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. दरम्यान, उमेदवारी घोषित होण्याअगोदरच आमदार संतोष बागर यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या 24 तारखेला ते कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
2019 च्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी विजय मिळविला होता. 16 हजार 123 मतांनी ते विजयी झाले. आता त्यांनी पुन्हा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशात बांगर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
हेही वाचा:
मशाल घेऊन चटके द्या; अजित पवारांना मोठा धक्का!
‘सॉरी मम्मी, पप्पा…’ लेकीच्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आईवडिलांना दिसला तिचा मृतदेह आणि…
आता विदर्भात काका विरुद्ध पुतण्या निवडणुकीत नात्यांचा उत्सव