एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?

राज्यात विधानसभा निवडणूका(political campaign) जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत करताच राज्यात आचारसंहितेला देखील सुरुवात झाली आहे. तसे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सर्वच राजकीय (political campaign)पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. अशात आचारसंहितेचा पहिला फटका शिवसेनेला बसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आमदार संतोष बांगर हे अडचणीत आल्याचं समजतंय. आमदार संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.

बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना फोनपे वरून पैसे पाठवण्याचे आमिष दिल्याचा आरोप बांगर यांच्यावर करण्यात आलाय. शुक्रवारी कळमनुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.

निवडणुक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. पुढील 24 तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा, असं त्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाकडून खुलासा करण्याचा आदेश आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना तो व्हिडिओ आपला नसल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर फोन पे चा अर्थ मला माहित नाही, गुगल पे सुद्धा माहित नाही असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.

मी कोणतीही वक्तव्य केलेली नाही. ती विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झालं आहे ते सर्व चुकीचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नंतर सुद्धा हाच खुलासा करणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले.

हेही वाचा:

दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात

संजय दत्त पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, ‘मुन्ना भाई 3’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! शरद पवार यांचा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का 

‘आता सुट्टी नाही’; यादी जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याची मोठी घोषणा!