‘सिंघम अगेन’मधील पहिल्या गाण्याने यूट्यूबवर उडवली खळबळ!

अजय देवगण आणि करीना कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणार आहे(song). रोहित शेट्टीच्या या कॉप युनिव्हर्समध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अभिनेता रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

जबरदस्त ॲक्शनसोबतच या मल्टीस्टारर चित्रपटात भरपूर थ्रिलरही पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये स्टार्सच्या अप्रतिम ॲक्शन आणि सस्पेन्सने चाहत्यांची उत्कंठा वाढवली होती. आता ‘सिंघम अगेन’चे पहिले गाणे(song) ‘जय बजरंगबली’ रिलीज झाले आहे, ज्यामध्ये अभिनेता रणवीर सिंग ‘हनुमान जी’ बनून अजय देवगणची सेवा करताना दिसत आहे.

सारेगमप म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील ‘जय बजरंगबली’ हे नवीन गाणे(song) रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात रणवीर सिंग अजय देवगणचा ‘हनुमान’ बनून आविष्कार करताना दिसत आहे. पोलिसांच्या गणवेशात रणवीर खूपच सुंदर दिसत आहे.

अजय देवगण आणि रणवीरची डॅशिंग स्टाइल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे. श्री कृष्णा, करीमुल्ला आणि अरुण कौंदिनय यांच्यासह अनेक कलाकारांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे थमन एस यांनी संगीतबद्ध केले असून त्याचे बोल स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत. या गाण्याला यूट्यूबवर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सिंघम अगेन’ 1 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. या चित्रपटाचे बजेट 350 ते 375 कोटी रुपये आहे. ‘सिंघम अगेन’ची निर्मिती रोहित शेट्टीसह अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे.

या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स पोलीस अधिकारी म्हणून एकत्र येऊन शत्रूंचा पराभव करणार आहेत. हा चित्रपट ‘रामायण’शी जोडून बनवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.

हेही वाचा:

एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?

पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! शरद पवार यांचा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का 

दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात