एअरटेलने(airtel plans) नुकतेच आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीचे अन्य प्रतिस्पर्धी जिओ आणि वोडाफोन आयडियाने देखील हे पाऊल उचलले आहे. एअरटेलच्या प्रीपेड आणि पोस्टपेड पोर्टफोलिओतील जवळपास सर्वच प्लॅन्सच्या किंमतीत वाढ झाली होती.
आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या एका प्रीपेड रिचार्ज प्लॅनबद्दल सांगत आहोत, यात तुम्हाला दीर्घ वैधतेसोबतच इतरही अनेक फायदे मिळतील. या प्लॅनविषयी खाली विस्ताराने वाचा.
एअरटेलच्या(airtel plans) या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला वर्षभर वारंवार रिचार्ज करण्याची चिंता करायची गरज नाही आणि तुम्ही अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिटसह रोज मोफत डेटाचा आरामात आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे एअरटेलच्या पोर्टफोलिओमधील हा सर्वात स्वस्त 365 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आहे.
सध्या एअरटेलकडे उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त वार्षिक वैधता प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन वर्षभर वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास तर दूर करतोच, शिवाय तुम्हाला काही चांगले फायदेही देतो. एअरटेलच्या 1,999 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता मिळते. या वैधतेदरम्यान युजर्संना एकूण 24 GB डेटा मिळतो. यावरून हे स्पष्ट होते की, हा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्या लोकांसाठी अजिबात बनवलेला नाही. दिवसभर इन्स्टंट मेसेजिंग किंवा ईमेल किंवा ब्राउझिंगसाठी हे पुरेसे असले पाहिजे.
एअरटेलच्या या दीर्घ वैधतेच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळतो. इतकेच नाही तर या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 100 फ्री एसएमएसचा देखील फायदा मिळतो.
1 हजार 999 रुपयांच्या एअरटेल रिचार्ज प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जसे की या पॅकने रिचार्ज केलेल्या युजर्सना Airtel Xstream मध्ये फ्री कंटेंट पाहण्याचा फायदा मिळेल. मात्र, लक्षात ठेवा की Airtel Xstream चे प्रीमियम सब्सक्रिप्शन नसेल तर युजर्स प्रीमियम (पेड) कंटेंट पाहू शकणार नाहीत.
याशिवाय या प्लॅनमध्ये Apollo 24|7 Circle चाही समावेश आहे. तसेच 7 सर्कलचे 3 महिन्यांचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. इथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की हे फक्त नवीन युजर्ससाठी आहे जर तुम्ही हे सब्सक्रिप्शन आधी घेतले असेल तर तुम्हाला फ्री सब्सक्रिप्शन मिळणार नाही. याशिवाय Wynk Music ला फ्री हॅलो ट्यून्सचा देखील फायदा मिळणार आहे. यामध्ये युजर्स दरमहा एक Hello Tunes सेट करू शकतात.
हेही वाचा:
अबब.! आपल्या महाराष्ट्रात तब्बल 145 राजकीय पक्ष
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु करण्याचे अमित शाह यांचे षडयंत्र’; संजय राऊतांचा घणाघात
बाबा सिद्धीकीनंतर लॉरेन्स बिश्नोईचे पुढचे टार्गेट राहूल गांधी…; अभिनेत्याचे वादग्रस्त विधान