बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान(superstar) सध्या प्रचंड चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे सलमान चर्चेत आहे. हे प्रकरण प्रचंड जुनं असलं तरी देखील सलमानने अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता सलमानने या ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर अखेर मौन सोडलं आहे. 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात घडत असेलल्या गोष्टींबद्दल बोलला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येची संपूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. बाबा सिद्दीकी हे सलमानचे जवळचे मित्र होते. बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे सलमान प्रचंड दु:खी होता. या संपूर्ण प्रकरणानंतर देखील सलमान काहीही बोलला नव्हता. मात्र आता सलमान खानने आयुष्यातील या गोंधळावर पहिल्यांदाच मौन सोडले आहे.
सलमान खानला(superstar) हिंदी चित्रपटसृष्टीतील सुलतान आणि दबंग खान म्हणून ओळखले जाते. पण सध्या लॉरेन्स बिश्नोई नावाने त्याच्या आयुष्यात ग्रहण लागले आहे. तुरुंगात असलेल्या या टोळीकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याचा जवळचा मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. आता या प्रकरणावर सलमान खानने जाहीरपणे आपले मौन तोडले आहे आणि सांगितले आहे की, सध्या तो त्याच्या आयुष्यातील या कठीण टप्प्याचा सामना करत आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली असून याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये सलमान खानसोबतची जवळीक हे सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेत बरीच वाढ करण्यात आली असून, त्याला दररोज वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या येत आहेत. या सर्व प्रकरणांवर सलमान खानने बिग बॉस 18 च्या वीकेंड का वारमध्ये आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शोमध्ये तो म्हणाला, यार, मी देवाची शपथ घेतो, आजकाल मी माझ्या आयुष्यात ज्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे फक्त मलाच माहित आहे आणि मला आता तुम्हा कंटेस्टेंटना हँडल करायचे आहे. मला आज इथे येण्याची गरज नव्हती. ही माझी बांधिलकी आहे, ज्यामुळे मी आज इथे उभा आहे. हे माझे काम आहे, एवढेच मोठे कारण आहे.
काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांना व्हॉट्सॲपवर सलमान खानच्या नावाने 5 कोटी रुपयांच्या खंडणीचा मेसेज आला होता. यानंतर सलमानच्या चाहत्यांची चिंता अधिकच वाढली आहे. बिग बॉस 18 च्या या वीकेंड का वार एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल होत आहे.
वादांपासून दूर जात, सलमान खानच्या आगामी सिनेमांची यादी पाहिली तर त्यात पहिलं नाव सिकंदरचं आहे. दिग्दर्शक एआर मुरुगादास आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना सलमानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:.
चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्…
‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका
‘…तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन’; विद्या बालन ‘हे’ काय बोलून गेली