दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीच्या(Politics) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इच्छुक असलेले उमेदवार दिलीप खोडपे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खोचक टीका केली आहे. जामनेरमधील कार्यकर्त्यांना गिरीश भाऊंचं तोंड तरी कधी दिसायचं का? तसेच त्यांचे ठराविक बगलबच्चेच मागे पुढे असायचे अशी टीका दिलीप खोडपे यांनी केली आहे. आता त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे असा सामना रंगणार आहे. मात्र यावेळी दिलीप खोडपे यांनी गिरीश महाजन(Politics) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. जामनेर येथील कार्यकर्त्यांना गिरीश भाऊंचं तोंड तरी कधी दिसायचं का? त्यांचे ठराविक बगलबच्चेच त्यांच्या मागे पुढे असायचे. तसेच बगल बच्चे इतके भारी की, चहा पेक्षा किटली गरम… मात्र आता आपल्याला ही किटली देखील थंड करायची आहे आणि चहा सुद्धा घ्यायचा नाहीये.

मात्र आता जामनेर मधील नागरिकांनी हायगाई करू नका. त्यांनी थोडी कष्टाने पैसा कमवलेला आहे. तो तर फुकटचाच पैसा आहे. तसेच आता दिवाळी आहे. त्यामुळे पोत्यानं पैसा येवू द्या. तसेच पैसे मात्र घेवून घ्या आणि दिवाळी साजरी करून आणि मतदानाच्या दिवशी त्यांचे दिवाळ काढा असं दिलीप खोडपे म्हणाले आहेत.

याशिवाय गिरीश महाजन आधी निवडणुकीमध्ये म्हणायचे की, तुम्हाला आमदार पाहिजे की सालदार… लोकांना असं वाटायचं वाव सालदारासारखं काम करणारा हा माणूस आहे. पण आता तुम्ही बघा सालदार तर दूर पण ते मालदार नक्की झाले आणि त्यांनी आपल्याला सालदार करून ठेवलं आहे.

या सगळ्या गोष्टींचा जनतेने विचार करा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही या निवडणुकीत काम करा आणि त्यांना त्यांची जागा मात्र दाखवून द्या असं म्हणत दिलीप खोडपेंनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा:.

सलमान खानने आयुष्यात पहिल्यांदाच ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर सोडलं मौन

चायनीजचं आमिष दाखवत 10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, तिच्याच घरात नेलं अन्…

‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका