‘भाऊ, मी हरलो, माफ करा…’, करवा चौथच्या दिवशी पती-पत्नीची आत्महत्या, पत्नीने रेल्वेसमोर उडी मारली तर पतीने…

देशभरात अनेक ठीकाणी काल (20 ऑक्टोबर) करवा चौथ साजरा करण्यात आला. हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात. मात्र राजस्थानच्या जयपूरमधून याचदिवशी पती-पत्नीने मृत्यूला(suicide) कवटाळल्याची धक्कादायक घटना समोर आली.

राजस्थानच्या जयपूरमध्ये रात्री उशीरापर्यंत घरात एकटी पत्नी आपल्या पतीची वाट पाहत चंद्राकडे बघत बसली होती. मात्र त्या रात्री पती घरी उशीरा परतला म्हणून दोघांमध्ये जोरदार भांडण झाली. रागाच्याभरात पत्नी घराच्या बाहेर पडून रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या(suicide) करते. पत्नीचा छिन्नविछिन्न मृतदेह पाहून पतीने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, करवा चौथच्या रात्री पती-पत्नी यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण झाले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही महिला रागाच्या भरात घरातून निघून गेली. त्यानंतर तिचे पतीने देखील घर सोडले. जयरामपुरा कल्व्हर्टजवळ रेल्वे रुळावर येताना पाहून या महिलेने उडी घेत आत्महत्या केली. यावेळी रेल्वे रुळावर पत्नीचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून पतीला स्वत:वर नियंत्रण न ठेवता घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने आपल्या मोठ्या भावाला व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट पाठवली आणि लिहिले, ‘भाऊ, मी हरलो आहे, माफ करा! माझ्या पत्नीचा रेल्वेसमोर मृत्यू झाला. असे लिहून त्यांनी स्वतः मृत्यूला कवटाळले.

हरमदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांगल सिरस गावात ही घटना घडली. जिथे रविवारी रात्री उशिरा घरी आल्याने घनश्याम विणकर (वय ३८ वर्षे) याने गळफास घेत आत्महत्या(suicide) केली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले आणि पत्नी मोनिका घरातून निघून गेली. यानंतर घनश्यामने मोनिकाची समजूत काढण्यासाठी तिच्या मागे धाव घेतली. मात्र मोनिकाने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली.

यावेळी मोनिकाच्या शरीराचे तुकडे झाले. हे पाहून घनश्याम घरी आला आणि काही तासांनंतर पत्नीच्या साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. पती-पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच हरमदा पोलीस स्टेशनने घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला.

मृताने लिहिले, “भाऊ, मी हरलो, माफ करा!” गणपत जी आणि घनश्याम कंडेल यांच्याशी बोला, ते तुम्हाला मदत करतील. आता तुला माझ्या आयडीवर काम करावं लागेल, आज माझ्या पत्नीचा रेल्वेसमोर मृत्यू झाला.” हा आत्महत्येचा संदेश मोठ्या भावाला मिळेपर्यंत घनश्यामने जीवन संपवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनश्याम एका नेटवर्क मार्केटिंग कंपनीत कामाला होता आणि करवा चौथला उशिरा घरी पोहोचला होता. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि दोघांनी आत्महत्या केली.

हेही वाचा:.

कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणात पुन्हा आजी-माजी आमदार!

दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

सलमान खानने आयुष्यात पहिल्यांदाच ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर सोडलं मौन