कागलच्या राजकारणात जाळ अन् धूर संगटच; मुश्रीफ- समरजित यांच्यात आरोप प्रत्यारोप

कागलच्या राजकीय(current political news) विद्यापीठात पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांच्या मध्ये कलगीतुरा सुरू आहे. परिवर्तनाच्या लढाईत कोण बाजी मारणार याबद्दल उलट सुलट चर्चा रंगली आहे. कागलच्या राजकारणात जाळ आणि धूर निघत आहे. कागल गडहिंग्लज मतदारसंघात मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यासाठी विधानसभेची निवडणूक कसोटीची आहे. ही निवडणूक दोघांनीही प्रतिष्ठेची केली आहे हे गेल्या महिन्याभरात स्पष्ट झाले आहे.

गेल्यावेळी मुश्रीफ(current political news) यांनी समरजित घाटगे यांच्यावर मात केली होती. मात्रं गेल्या पाच वर्षांत समरजित घाटगे यांनी परिश्रम घेऊन मतदारसंघात मोर्चेबांधणी केली असली तरी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन तुतारी फुंकणार हे स्पष्ट झाल्याने कागलच्या राजकारणात रंगत निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौकात समरजित घाटगे यांनी शक्तिप्रदर्शन घडवले.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघाले. केवळ ट्रेलरने मुश्रीफ यांचा तोल ढळला अशी टीका जयंत पाटील यांनी करीत मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुश्रीफ यांनी समरजित यांच्यावर शरसंधान साधत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने त्याचे पडसाद उमटले.

मंत्री मुश्रीफ यांनी विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केले याचा लेखा जोखा मांडला असला तरी सर्वागीण विकासाकरिता परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समरजित यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर विकासाचे व्हिजन व्यापक करून मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह नवीन उद्योगधंदे उभारणी याबाबत ठोस पावले नेतेमंडळीनी उचलावीत याकडे सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा आहेत.

गडहिंग्लज उपविभागात एकही मोठा उद्योग नाही. अद्यापही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. केवळ रस्ते, गटारी बांधल्या हाच विकास नव्हे याकडे लक्ष वेधत सर्वसामान्य जनता सर्वागीण विकासासाठी नेत्यावर दबाव आणून परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरसावली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कागलच्या राजकीय विद्यापीठात मुश्रीफ, राजेघाटगे , मंडलिक, संजय घाटगे असे चार गट सक्रिय आहेत. तालुक्यात चारही गटाचे समान बलाबल आहे. गडहिंग्लज आणि उत्तूर विभागावर मुश्रीफ आणि समरजित घाटगे गटाची भिस्त आहे. गडहिंग्लज उपविभागातील गटा तटाचे राजकारण कुणाच्या पथ्यावर पडणार याबद्दल उलट सुलट चर्चा आहे.

मुश्रीफ सहाव्यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. खासदार पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी आपल्या आजोबांना काय त्रास झाला त्याबद्दल सूचक विधान करीत मुश्रीफ आणि राजेघाटगे यांच्या वर शरसंधान साधत राजकारणात बापसे बेटा सवाई हे सिद्ध केले आहे. मुश्रीफ यांच्या गोटात संजय घाटगे, संजय मंडलिक आधीच डेरेदाखल झाले आहेत.

समरजित घाटगे एकाकी पडले असले तरी शरद पवार राष्ट्रवादी गट त्यांच्या पाठीशी ठाम आहेत . महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहेत. सतेज पाटील आणि आमच ठरलंय असे समरजित घाटगे यांनी स्पष्ट केले असले तरी गडहिंग्लजमध्ये जनता दलाचा निर्णय काय होईल याबद्दलही जोरदार चर्चा आहे.

परिवर्तनाच्या लढाईत मुश्रीफ की समरजित बाजी मारणार याबद्दल विविध शक्यता चर्चेत आहेत. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मतदारसंघात संघर्षाचा जाळ आणि धूर निघत आहे.

हेही वाचा:.

कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणात पुन्हा आजी-माजी आमदार!

दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

‘भाऊ, मी हरलो, माफ करा…’, करवा चौथच्या दिवशी पती-पत्नीची आत्महत्या, पत्नीने रेल्वेसमोर उडी मारली तर पतीने…