काळ आला की मृत्यू अटळ आहे! पाहा वेळ आली माणूस कसा जाळ्यात अडकतो video

मृत्यू(death) ही एक अशी गोष्ट आहे जी कोणत्याही माणसाच्या हातात नाही. असे म्हणतात की, काळ आला की मृत्यू अटळ आहे. मानवाने जगात बरीच प्रगती केली मात्र मृत्यू ही एक अशी एकमेव गोष्ट आहे जी मानवाच्या हातात नाही. माणसाच्या नशिबात जे असतं ते घडतंच याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. व्हिडिओत तरुण कसा मृत्यूच्या जाळयात अडकतो ते दिसत आहे. व्हिडिओतील थरारक दृश्ये पाहून तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.

सदर घटना व्ही व्ही प्राईड हॉटेलमध्ये घडली आहे. तर झाले असे की, 22 वर्षांचा उदय कुमार आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेला होता. या पार्टीसाठी त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर काही खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री तो कोणत्या कारणास्तव खोलीच्या बाहेर पडला. त्यावेळी त्याला दरवाजाबाहेर एक कुत्रा दिसला . त्या कुत्र्याला तेथे पाहून उदय शॉक झाला आणि त्याने कुत्र्याला तेथून हाकलायला सुरुवात केली.

मात्र काही केल्या तो कुत्रा काही तेथून जाण्यास तयार नव्हता. परिणामी उदय कुत्र्याला हाकलण्यासाठी कुत्र्याला हकलत त्याच्या मागे पळू लागला आणि हेच त्याचे मृत्यूचे कारण ठरले. कुत्र्याच्या मागे पळता पळता तो अचानक खिडकीतून बाहेर पडला आणि जागीच त्याचा मृत्यू(death) झाला. तो खाली पडताच रस्त्यावरील लोक आरडाओरड करू लागली. हा सर्व गोंधळ पाहून त्याचे मित्र बाहेर आले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्याने आपले प्राण सोडले. ही सर्व घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

मृत्यूचा हा थरारक व्हिडिओ @sudhakarudumula नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे,”त्याच्या कुटुंबासाठी खूप दुःख आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या वागण्या-बोलण्यातून असे दिसून येते की तो कशाच्यातरी प्रभावाखाली होता, कुत्रा हे यामागचे कारण नाही”.

हेही वाचा:

पुष्पा 2 चा प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवर डंका, प्रीरिलीजची कमाई 1000 कोटींहून अधिक

BSNL’च्या रिचार्जची नाही वाढणार किंमत! सर्वात स्वस्त असेल 4G-5G सर्व्हिस

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा: OTT वर धमाकेदार सस्पेन्स, थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपटांची लयलूट!