कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा (political news)निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघाचा महात्म्य अनन्य साधारण आहे. कारण या मतदारसंघातूनच अनेकांचं नेतृत्व सिद्ध होऊन पुढे आलेले आहे. माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे, माजी मंत्री दिग्विजय खानविलकर, दिवंगत आमदार पी एन पाटील, यांचे याच मतदारसंघातून नेतृत्व पुढे आले तर माजी पालकमंत्री जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे अपक्ष आमदार म्हणून याच मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तेव्हा त्यांना शिवसेनेसह सहा राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. सध्या त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा आहे.
दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघात त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे राजकीय संदर्भ थोड्याफार प्रमाणात या मतदारसंघात बदलले आहेत. अविभाजित शिवसेनेकडून दोन वेळा विधानसभेवर निवडून गेलेले चंद्रदीप नरके हे विभाजित शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ही निवडणूक लढवत आहेत.
तर राहुल पाटील हे पहिल्यांदा ही निवडणूक (political news)लढवत आहेत आणि त्यांना वडिलांचा राजकीय वारसा मिळालेला आहे. पूर्वीचा सांगरूळ विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये करवीर म्हणून अस्तित्वात आला. या मतदार संघात पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ येतात. दुर्गम असा गगनबावडा तालुका सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. भौगोलिक दृष्ट्या तो उमेदवारांना दमवणारा आहे.
शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा तो अवघड आहे. पूर्वीचा सॅंडर्ड आणि आजचा करवीर विधानसभा मतदारसंघ हा कधी डावीकडे, कधी उजवीकडे तर कधी हिंदुत्ववादी विचारसरणी कडे झुकलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे संपत बापू पाटील हे सलग दोन वेळा येथून विधानसभेवर निवडून गेले आहेत आणि त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पी एन पाटील हेच होते. शिवसेनेचे चंद्रदीप नरके हे दोन वेळा सलगपणे निवडून गेले आहेत. सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी एन पाटील हे या मतदारसंघाचे विधानसभेवर प्रतिनिधित्व करत होते. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचे उमेदवार राहुल यांना सहानुभूतीचे वातावरण आहे.
ही सहानुभूती मतदान यंत्रापर्यंत पोहोचते की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात पी एन पाटील विरुद्ध नरके असा जुनाच संघर्ष आहे. चंद्रदीप नरके यांची सत्ता असलेला कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी पी एन पाटील यांनी अनेकदा प्रयत्न केले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रदीप नरके यांचा पराभव केला होता.
त्यानंतर शिवसेनेत बंड झाले आणि बदलत्या राजकारणात (political news)चंद्रदीप नरके यांनी यांनी ठाकरे यांची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्या सेनेत दाखल झाले. त्यांनी यापूर्वी दोन वेळा धनुष्यबाण या चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती आणि आता सध्याही बदलत्या राजकारणातसुद्धा त्यांना धनुष्यबाण हेच निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. चंद्रदीप नरके यांचा या निवडणुकीत नजीकचा प्रतिस्पर्धी मात्र बदलला आहे.
दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यासमोर आहेत. या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक दोन वेळा जिंकलेले शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पाटील यांनी राहुल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. अर्थात शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत असल्याने त्यांनी येथे तसा आघाडी धर्म पाळलेला दिसतो.
चंद्रदीप नरके हे कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा असल्यामुळे त्यांचा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच गावांशी संपर्क आहे. शिवाय मतदार संघातील प्रत्येक गावात ते कोणत्या ना कोणत्या कारणाने पोहोचलेले आहेत.
सध्याचा करवीर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी सांगरूळ नावाने ओळखला जात होता. विशेष म्हणजे या मतदारसंघातून राहुल पाटील यांचे आजोबा, दिवंगत पी एन पाटील यांचे सासरे दिवंगत श्रीपतराव बोंद्रे यांनी हा मतदारसंघ बांधला होता. ते या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जायचे. त्यांच्या निधनानंतर पी एन पाटील यांनी येथून निवडणुका लढवल्या पण त्यात त्यांना यश आले नव्हते.
राहुल पाटील यांना असा हा राजकीय वारसा लाभलेला आहे तर चंद्रदीप नरके यांचे आजोबा डी सी नरके यांच्याकडून सहकाराचा वारसा लाभलेला आहे. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे डी सी नरके हे संस्थापक अध्यक्ष होते.
तशी ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी होत असली तरी नरके हे विभागल्या गेलेल्या शिवसेनेतून, शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पी एन पाटील यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना करवीर विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. हे इथे लक्षात घेतले पाहिजे. या मतदारसंघात राहुल पाटील यांना मतदारांची सहानभूती आहे असे म्हटले जात असले तरी, ही सहानुभूती मतदान यंत्रापर्यंत पोहोचणार का याच्याबद्दल आत्ताच काही भाष्य करता येत नाही.
हेही वाचा :
कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?
क्षणार्धात मृत्यूने गाठलं! तरुणाने अचानक काही सेकंदातच मित्रांसमोर सोडले प्राण Video
दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेपासून 24 तास मिळणार वीज