इचलकरंजी शहरात भाजपा(political) युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या मार्गदर्शनात आणि शहर अध्यक्ष जयेश बुगड यांच्या नेतृत्वात “विकसित महाराष्ट्र अभियान” अंतर्गत बाईक रॅली आणि युवा संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनाने झाली. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकजूट निर्माण करण्याचा संदेश देत या रॅलीने शहरभर भव्य प्रदर्शन केले. रॅलीदरम्यान, युवा कार्यकर्त्यांचा(political) उत्साह आणि स्फूर्ती पाहण्याजोगी होती.
उपस्थित मान्यवर:
सुरेशराव हाळवणकर – प्रदेश उपाध्यक्ष
डॉ. राहुल आवाडे – महायुती अधिकृत विधानसभेचे उमेदवार
अनुप दादा मोरे – युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष
अमनदीप सिंग – राष्ट्रीय मीडिया प्रमुख
सुदर्शन पाटसकर – प्रदेश सरचिटणीस
मोहिनीताई एकबोटे – प्रदेश उपाध्यक्ष
अरविंद माने – युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष
अमृत मामा भोसले – शहर अध्यक्ष
याशिवाय वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष आशोक अण्णा स्वामी, माजी उपनगाध्यक्ष उदयराव बुगड, तानाजी पवार, माजी नगरसेवक दिलीप मुथा, रवि आवाडे, मनोज हिंगमिरे, आणि राजेश राजपूत यांसह इचलकरंजीतील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात जयेश बुगड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “विकसित महाराष्ट्र” या संकल्पनेला पाठिंबा दिला. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नामदेव सातपुते, मनोज तराळ, हेमंत वरुटे, नितीन पडियार, राहुल सावेकर, सचिन पोवार, श्रेयश गट्टानी, हर्षवर्धन गोरे, राहुल गागडे, अंकुश पोळ, शुभम होनमोर, आदित्य बनसोडे, अनिकेत बांगड, सूरज अडेकर, विशाल शिरगावे, अर्जुन शिंदे, आदित्य पाटील, प्रवीण बनसोडे, शुभम भाकडे, विष्णु पाखरे, प्रतीक चौगुले, सागर शिवलिंगे, विवेक शिंदे, यश वैचल, उमेश गोरे, विशाल माने, उमाकांत दाभोळे, मनोज जाधव, मयूर दाभोळकर, वैभव लिगाडे, विराज इंगळे, शुभम बरगे आणि इतरांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने कार्य करण्याच्या निर्धाराने झाली.
हेही वाचा :
सांगलीत अजित पवारांचा भाजपला गुलीगत धोका…
‘शेवटी प्राजक्ता पृथ्वीकची झाली…’; ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेता गुपचूप अडकला लग्न बंधनात
ऐन निवडणुकीत संजय राऊत यांना मोठा दिलासा; 15 दिवसांची कोठडी स्थगित