‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्यास कमी वयात शरीरात जाणवतो सांधेदुखी

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित पाणी(water) पिणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात कमीत कमी 7 ते 8 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात.जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजांची सगळ्यांचं आवश्यकता असते. पण याच गरजा व्यवस्थित पूर्ण नाही झाल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडू लागते.

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची(water) आवश्यकता असते. मुबलक प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे हळूहळू आरोग्य बिघडू लागते. तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते.चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यामुळे सांधेदुखी, किडनी स्टोन, हातापायांचे स्नायू दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

पाणी पिणे शरीरासाठी अतिशय चांगले आहे. पण अति प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीराचे नुकसान होते. आपण अनेकदा घाईगडबडीमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच पाणी पितो. पाण्याचे मोठे मोठे घोट घेतल्यामुळे शरीराला पाणी पचवणे अवघड होऊन जाते. यामुळे किडनीला गरजेपेक्षा अधिक काम करावे लागते, ज्याचा नकारात्मक परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो. यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सावकाश आणि हळूहळू प्यावे.

उभं राहून पाणी पिणे:
अनेकांना सवय असते बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर सुद्धा उभं राहून पाणी पितात. पाणी ही सवय अतिशय चुकीची आहे. उभं राहून पाणी प्यायल्यामुळे आरोग्य बिघडते. उभं राहून प्यायलेले पाणी पचन होण्यास जास्त वेळ लागतो. हे पाणी योग्यरित्या हाडांच्या स्नायूंपर्यंत पोहचत नाही. यामुळे सांधेदुखी, हाडांचे दुखणे वाढते. उभं राहून पाणी प्यायल्यामुळे सांध्यांवर दाब येतो आणि सांध्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते.

जेवणताना खूप पाणी पिणे:
काहींना जेवणताना सतत पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे पोटात कमी प्रमाणात अन्नपदार्थ जातात आणि पाण्याचे प्रमाण जास्त होते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. शरीरात गेलेले अन्नपदार्थ व्यवस्थित शोषले जात नाहीत. याचा शरीरातील हाडांवर आणि स्नायूंच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. पण थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे घसा दुखणे, सर्दी किंवा खोकला होणे, ताप येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील सूज वाढण्याची शक्यता असते. थंड पाण्यामुळे सांधे आणि स्नायू आखडून जातात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

हेही वाचा :

सांगलीत अजित पवारांचा भाजपला गुलीगत धोका…

ऐन निवडणुकीत संजय राऊत यांना मोठा दिलासा; 15 दिवसांची कोठडी स्थगित

इचलकरंजीत भाजपा युवा मोर्चाचा “विकसित महाराष्ट्र अभियान” अंतर्गत भव्य बाईक रॅली आणि संवाद कार्यक्रम