राज्यातील सध्याचे मंत्रिमंडळ(Cabinet) जेलमध्ये गेले पाहिजे, इतका धिंगाणा घातला आहे. 30 टक्के टेंडर ची मर्यादा ओलांडून वाटले आणि पैसे खाल्ले आहेत. 8 लाख कोटी कर्ज आणि 2 लाख कोटींची देणं आहे. दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केली आहे. राज्याच्या तिजोरीवर सफाईदारपणे हात मारला आहे. अशी घणाघाती टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
जो जिंकेल त्याला उमेदवारी, नाते-गोते नाही तर जिंकण्याची हमी असले तो उमेदवार असेल. महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी स्वतः राहुल गांधी यांनी लक्ष घातले आहे(Cabinet). 87 जागा घोषित केल्या आहेत. तर 14 जागेवर स्क्रिनिंग आणि (सीईसी) CEC झाली आहे. आम्ही संख्या मोजत नाही, तर जिंकणारे उमेदवार मोजत आहोत. जे महाविकास आघाडीचे आता 200 च्या पुढे जात आहे. तर अनेक जागेवर पुनरविचार होत आहे. सोशल इंजिनिअरिंग संबंधाने राहुल गांधी काळजी घेत आहे. अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
दलित आदिवासी सर्व समाजातील लोकांसाठी झडगड असतात, मायक्रो ओबीसी, एससी, एसटी यांचं प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आग्रही आहे. अनेक ठिकाणी मत मांडून होल्ड केले. साधारणपणे 9 ते 10 मतदारसंघात दुरुस्ती केली आहे. प्रत्येक पक्षाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ठाकरे गट जागा मागत आहेत.
आज रात्री 9 पर्यंत चित्र स्पष्ट होईल, आम्हाला विचारले तर महायुतीतही भांडण सुरू आहे. दरम्यान, दिग्रस आणि दर्यापूरसह दोन तीन जागा अदला बदली नक्कीच होईल. राहुल गांधी समोर विषय झाला असून रामटेकचा निर्णय आज दुपरपर्यंत होईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
आम्ही जोरगेवर भाजपमध्ये प्रवेश करेल याची वाट बघत होतो, जोरगेवर यांना आम्हाला घ्यायच नव्हतं, ते उमेदवार झाले तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल, मुनगंटीवार यांचा समझोता प्रेमाने झाला की जबरदस्तीने हे निकलानंतर स्पष्ट होईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. उद्या जाहीरनामा येईलच, आमचा पाच सूत्री कार्यक्रम आहे. दिवाळीची शुभ भेट ही असेल.
सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, नुसती फोकनाड बाजी नको. तेलंगणात भाजप लोकावर खोटी जाहिरात दिली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. महालक्ष्मी योजना सुरू आहे. आमची गॅरंटी आल्यावर 31 ते 30 ला जाहीरनामा निघेल, महाराष्ट्र उभं करताना जाहीरनामा असणार आहे, पृथ्वीराज बाबा अध्यक्ष आहे. भाजपच्या जाहिरनाम्याची वाट बघत आहोत. त्यानंतर आम्ही आमचा जाहीरनामा आणू असेही ते म्हणाले.
राज ठाकरे यांचा पक्ष मनसेच्या झेंड्यासोबत भूमिका बदलत असतो, त्यांची भूमिका ठरवू द्या. आत ते कुठल्या भूमिकेत आहे ते कळले नाही, कळल्यावर मी बोलेले असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा :
रोमँटिक डेटला जाणं तरुणाला पडलं महागात!
ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय फटका; दिवाळी भेट तर नाहीच
मतदारजागृतीसाठी ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम; जिल्हाधिकाऱ्यांचा नवमतदारांशी संवाद